IND vs AUS 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. सध्या भारताने 132 धावा करत 6 विकेट्स गमावल्या आहेत. यशस्वी जैस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर फलंदाजी करत असून भारताला हा सामना जिंकण्यासाठी 208 धावांची गरज आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामना सध्या रोमांचक वळणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 340 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने लंच ब्रेकआधी तीन विकेट्स गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांच्यात चांगली भागिदारी झाली होती. जैस्वाल आणि पंतने 88 धावांची भागिदारी केली. पंरतु टी ब्रेकनंतर म्हणजेच अखेरच्या सत्रात भारताने 9 धावांत तीन विकेट्स गमावल्या. यामध्ये ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या विकेट्सचा समावेश आहे.
ट्रेव्हीस हेड्सने चिडवले-
टी ब्रेकनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने थेट ट्रेव्हीस हेड्सच्या हातात चेंडू दिला. हेड्सने ऋषभ पंतला झेलबाद करत भारताला मोठा धक्का दिला. ऋषभ पंतला बाद करणं ऑस्ट्रेलियासाठी महत्वाचे होते. खराब फटका खेळत ऋषभ पंत बाद झाला. यानंतर हेड्सने मैदानात उपस्थित असणाऱ्या भारतीय चाहत्यांना चिडवल्याचे दिसून आले. भारताने 9 धावांत 3 विकेट्स गमावल्यानंतर सर्व भारतीयांचे चेहरे उतरल्याचे दिसले.
टीम इंडियाच्या 9 धावांत धडाधड विकेट्स-
भारताने 121 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या, परंतु आता 130 धावांवर 6 विकेट्स गमावल्या. टीम इंडियाने 9 धावांमध्ये 3 विकेट गमावल्या आहेत. नितीश रेड्डी एक धाव काढून बाद झाला. त्याला नॅथन लियॉनने बाद केले. याआधी रवींद्र जडेजा 01 धावा करून बाद झाला तर ऋषभ पंत 30 धावा करून बाद झाला.
रोहित शर्मा-विराट कोहली स्वस्तात बाद-
कर्णधार रोहित शर्माच्या या दौऱ्यात शेवटच्या 4 डावांत मधल्या फळीत खेळला, पण जेव्हा धावा झाल्या नाहीत. त्यामुळे तो पुन्हा सलामीला आला. मात्र, मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात 5 चेंडूत 3 धावा करणाऱ्या रोहित शर्माने दुसऱ्या डावात 40 चेंडू खेळले पण त्याला 9 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. 340 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला मेलबर्नमध्ये रोहितच्या रूपाने पहिला धक्का बसला. रोहित स्वस्तात आऊट झाला. विराट कोहलीची अवस्थाही तशीच होती. विराट क्रीझवर आल्यावर आशा होती, पण भारताची आशा तितक्याच लवकर भंगली. आज संघाला कोहलीकडून जबरदस्त खेळीच्या अपेक्षा होत्या, तेव्हा त्याच्या बॅटमधून फक्त 5 धावा आल्या.