WTC Points Table Updates: गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Galle International Stadium) खेळण्यात आलेल्या कसोटी मालिकेत श्रीलंकेच्या संघानं 39 धावांनी (SL vs AUS) विजय मिळवला. या विजयासह दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेच्या संघानं मालिकेत 1-1 नं बरोबरी साधली. दरम्यान, श्रीलंकेच्या विजयानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत उलथापालथ पाहायला मिळाली. श्रीलंकेविरुद्ध पराभवानंतर ऑस्ट्रेलियाची डब्लूटीसीच्या गुणतालिकेच्या अव्वल स्थानावरून घसरण झालीय. तर, श्रीलंकेच्या संघाला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.


दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानी
आयसीसीनं नुकतीच जाहीर केलेल्या डब्लूटीसीच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाची एका स्थानानं घसरण झाली आहे. डब्लूटीसीच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झालीय. तर, श्रीलंकेच्या संघानं तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. डब्लूटीसीच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानी पोहचलाय.


ट्वीट-



भारत कितव्या क्रमांकावर?
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर श्रीलंकेच्या संघानं दुसऱ्या सामन्यात 39 धावांनी विजय मिळवून पुनरागमन केलं आहे. विजयासाठी 191 धावांची गरज असताना ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात 151 धावांवर ऑलआऊट झाला. या विजयासह श्रीलंकेच्या संघानं दिमुथ करुणारत्नेच्या नेतृत्वात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बरोबरी साधली. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं 10 विकेट्नं विजय मिळवला होता. आयसीसी डब्लूटीसीच्या गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघासाठी डब्लूटीसीची अंतिम फेरी गाठणं कठीण मानलं जात आहे. 


ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेचं दमदार प्रदर्शन
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या कसोटी मालिकेदरम्यान श्रीलंकेचे प्रमुख खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, तरीही श्रीलंकेच्या संघानं स्टार फलंदाज दिनेश चांदीम आणि प्रभात जयसूर्याच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर दुसरा कसोटी सामना जिंकला. 


हे देखील वाचा-