ENG vs IND : आज पार पडणाऱ्या भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानाची खेळपट्टी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावेल. सामना इंग्लंडच्या लंडन येथील केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असून एकदिवसीय मालिकेतील हा पहिलाच सामना असल्याने जिंकणाऱ्या संघाला मालिकेत आघाडी घेण्याची सुवर्णसंधी आहे. 


कसा आहे पिच रिपोर्ट?


आज सामना होणाऱ्या लंडन येथील केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी सपाट असल्याने फलंदाजांना अधिक फायदा आहे. म्हणूनच आज एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते. ज्यामुळे क्रिकेटप्रेमींना एक हाय वोल्टेज सामना अनुभवायला मिळू शकतो.  सर्व क्रिकेट प्रकारच्या सामन्यात याठिकाणी मोठी धावसंख्या होताना दिसून आलं आहे.आजची खेळपट्टी पाहता फिरकीपटूंना अधिक फायदा होण्याची शक्यता असल्याने भारत आपले अव्वल दर्जाचे फिरकीपटू संघात नक्कीच ठेवेल.


भारताचा एकदिवसीय संघ-


रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह 


टी20 मालिकेत भारत विजयी


आजपासून एकदिवसीय मालिका सुरु होत असून याआधी टी20 मालिका भारताने जिंकली आहे. इंग्लंड विरुद्ध भारत या टी20 मालिकेत पहिल्या सामन्यापासून भारताने आक्रमक आणि दमदार खेळ दाखवला. यावेळी पहिला सामना तब्बल 50 धावांनी भारताने जिंकत आधी मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा सामना 49 धावांनी जिंकत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली. पण अखेरच्या सामन्यात भारताला 17 धावांनी पराभव पत्करावा लागल्याने भारत इंग्लंडला व्हाईट वॉश देऊ शकला नाही. पण मालिका भारताने जिंकली.


हे देखील वाचा-