एक्स्प्लोर

WTC फायनलवर ऑस्ट्रेलियाची पकड मजबूत, भारताला विजयासाठी 444 धावांचे आव्हान

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर 444 धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियन संघाने आपला दुसरा डावत 8 बाद 270 धावांवर घोषित केला.

WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पकड मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 270 धावांवर घोषित केलाय. पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 444 धावांचे आव्हान दिलेय. भारतीय संघाला 137 षटकात हे आव्हान पार करायचे आहे.  दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून अॅलेक्स कॅरी याने सर्वाधिक 66 धावांचे योगदान दिलेय. टीम इंडियाकडून रविंद्र जाडेजा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर उमेश यादव याने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का. मार्नस लाबुशेन याला त्याने तंबूत धाडले. लाबूशन याने 41 धावांचे योगदान दिले. लाबुशेन बाद झाल्यानंतर कॅमरुन ग्रीन आणि अॅलेक्स कॅरी यांनी डाव सावरला. दोघांनी दमदार फलंदाजी केली. रविंद्र जाडेजाने ग्रीन याला तंबूत पाठवत भारताला मोठे यश मिळून दिले. पण त्यानंतर कॅरी आणि स्टार्क यांनी भारताची डोकेदुखी वाढवली. कॅरी याने अर्धशतकी खेळी केली. मिचेल स्टार्क 41 धावांवर शमीचा शिकार ठरला. पट कमिन्स पाच धावांवर बाद झाला. कर्णधार कमिन्स याने ऑस्ट्रेलियाचा डाव घोषित केला. 

ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा कॅरी याने चोपल्या. अॅलेक्स कॅरी याने 66 धावांची खेळी केली. मिचेल स्टार्क याने 41 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय स्मिथ 34, लाबुशेन 41 यांनीही महत्वाचे योगदान दिले. भारताकडून रविंद्र जाडेजा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. शमी आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. सिराजला एक बळी मिळाला.


तिसऱ्या दिवशी काय झाले ?

जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलवर ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवशी आपली पकड घट्ट केली आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 123 धावांची मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 173 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 296 धावांची झाली आहे. रविंद्र जाडेजा याने दोन तर उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मार्नस लाबुशेन 41 तर कॅमरुन ग्रीन 7 धावांवर खेळत होते. त्याआधी या कसोटीत टीम इंडियानं पहिल्या डावात सर्व बाद 296 धावांची मजल मारली. अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर या मुंबईकरांनी झुंजार फलंदाजी करून टीम इंडियाची लाज राखली. त्या दोघांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी रचून भारतीय संघाला फॉलोऑनपासून वाचवलं. अजिंक्य रहाणेनं 129 चेंडूंत 11 चौकार आणि एका षटकारासह 89 धावांची, तर शार्दूल ठाकूरनं 109 चेंडूंत सहा चौकारांसह 51 धावांची खेळी उभारली. 

महत्त्वाच्या बातम्या

IND VS ENG ODI Series Schedule : टी-20 संपली! आता वनडेचा थरार; IPL नंतर पहिल्यांदाच विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण Schedule
टी-20 संपली! आता वनडेचा थरार; IPL नंतर पहिल्यांदाच विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण Schedule
India lose No 1 T20I spot : इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, टीम इंडियाचा 4 वर्षांचा घमंड उतरला, ICC रँकिंगमध्येही उलटफेर, भारताला मोठा फटका
इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, टीम इंडियाचा 4 वर्षांचा घमंड उतरला, ICC रँकिंगमध्येही उलटफेर, भारताला मोठा फटका
Vaibhav Sooryavanshi Crying : टीम इंडियाचा पराभव होताच वैभव सूर्यवंशी भर मैदानात एकटा बसून रडू लागला; इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यानंतर काय घडलं?, VIDEO
टीम इंडियाचा पराभव होताच वैभव सूर्यवंशी भर मैदानात एकटा बसून रडू लागला; इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यानंतर काय घडलं?, VIDEO
Shreyas Iyer Ind vs Eng 5th T20 : आमच्याकडून मोठ्या चुका झाल्या...; क्लीन स्वीप अन् 6 पराभवानंतर कॅप्टन श्रेयस अय्यरचा संयम सुटला; व्हिलनचा केला पर्दाफाश, नेमकं काय म्हणाला?
आमच्याकडून मोठ्या चुका झाल्या...; क्लीन स्वीप अन् 6 पराभवानंतर कॅप्टन श्रेयस अय्यरचा संयम सुटला; व्हिलनचा केला पर्दाफाश, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Girija Raut : सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Vietnam Boat Capsized: समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
Iran War Live Update: 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
Embed widget