India Vs New Zealand : उद्यापासून सुरू होणार्‍या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने सामन्याच्या एक दिवस आधी अंतिम सामन्यात भाग घेणार्‍या 11 खेळाडूंची घोषणा केली. अंतिम सामन्यात भारताने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.







रोहित शर्मा आणि शुभमन गिल ओपनिंग करणार


न्यूझीलंडविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करतील. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर शुभमन गिलने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने गाबामध्ये 91 धावांची मॅच विनिंग खेळी खेळली होती. तेव्हापासून शुभमन गिलला सतत भारतीय कसोटी संघात संधी मिळत आहे.


World Test Championship Final : जागतिक कसोटीतील अंतिम विजेत्या संघावर बक्षिसांची खैरात; जाणून घ्या किती आहे बक्षीसपात्र रक्कम


तसेच ऋषभ पंतने अंतिम सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले आहे. ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियामध्ये कांगारूंविरूद्ध आणि नंतर इंग्लंडमध्ये घरच्या मैदानावर शानदार प्रदर्शन केले होते. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता टीम मॅनेजमेंट आणि कर्णधार कोहलीने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.


IND Vs NZ WTC Final: न्यूझीलंडचे 'हे' पाच खेळाडू टीम इंडियासाठी ठरु शकतात डोकेदुखी


दोन फिरकीपटूंना संधी 


कर्णधार विराट कोहलीने साऊथॅम्प्टनच्या खेळपट्टीवर दोन फिरकी गोलंदाजांसह उतरण्याचा निर्णय घेतला आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याने रवींद्र जाडेजा आणि आर अश्विन यांचा समावेश केला आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीमध्ये अनुभवी इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहला अंतिम सामन्यात संधी मिळाली आहे.


अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ 


विराट कोहली ( कर्णधार ), अजिंक्य रहाणे ( उपकर्णधार ), शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत ( विकेटकीपर ), रवींद्र जडेजा, आर अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.