IND Vs NZ WTC Final: न्यूझीलंडचे 'हे' पाच खेळाडू टीम इंडियासाठी ठरु शकतात डोकेदुखी
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जून रोजी खेळला जाणार आहे. इंग्लंडमधील अंतिम सामना खेळला जाणार असल्यामुळे न्यूझीलंडचं पारडं जड आहे. त्याशिवाय नुकत्याच झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान इंग्लंडला 1-0 ने नमवून न्यूझीलंडने हे सिद्ध केले की ते नशिबाने नव्हे तर त्यांच्या कामगिरीमुळे अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाले आहेत. अंतिम सामना प्रामुख्याने भारतीय फलंदाज आणि न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांमधील स्पर्धा म्हणून पाहिले जात आहे. तर त्या खेळाडूंबद्दल बोलू जे अंतिम सामन्यात भारतासाठी सर्वात मोठी समस्या ठरू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाईल जॅमिसन गेल्या वर्षी आयसीसी वर्ल्ड चॅम्यियनशिफ स्पर्धेदरम्यान काइल जॅमिसनने भारताविरुद्ध पदार्पण केले. जेमीसन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल्समधील सर्वात मोठं सरप्राईज पॅकेज मानलं जात आहे. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये जॅमिसन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जॅमिसनने आतापर्यंत 7 कसोटी सामन्यांमध्ये सुमारे 15 च्या सरासरीने 39 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये एका डावात चार वेळा पाच विकेट आणि एका सामन्यात 10 विकेट घेण्याचा समावेश आहे. जर सात सामन्यांचा विचार केला तर जॅमिसनची गोलंदाजीची सरासरी गेल्या 100 वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्तम तीन गोलंदाजांपैकी एक आहे.
टीम साउदी 78 कसोटी सामने खेळलेला टीम साऊदी न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. साऊदीला स्विंगवर मजबूत पकड असलेला गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. इंग्लंडमधील परिस्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकूल असल्याने साऊथीची स्विंग गोलंदाजी भारतीय खेळाडूंसाठी समस्या बनू शकतो. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात साऊदीने 7 विकेट्स घेऊन उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचे सिद्ध केले. याशिवाय टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला टीम साऊदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9 वेळा आऊट केलं आहे.
ट्रेंट बोल्ट ट्रेंट बोल्ट हा साऊदीनंतर न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. ट्रेंट बोल्ट त्याच्या आउटसिंग बॉलिंग आणि यॉर्कर्ससाठी ओळखला जातो. बोल्टने 2019 च्या वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात भारतीय टॉप ऑर्डरला खासकरून रोहित शर्माला त्यांच्या गोलंदाजीने त्रास दिला होता. ट्रेंट बोल्टची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्याच्याकडे यॉर्करच्या माध्यमातून खालच्या फळीतील फलंदाजांना पटकन बाद करण्याची क्षमता आहे.
डेवोन कॉनवे न्यूझीलंडला ओपनिंग फलंदाजीची कमतरता जाणवत होती. पण इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचीही ही समस्या संपली. डेवोन कॉनवेच्या रुपाने न्यूझीलंडला ओपनिंगसाठी नवा स्टार मिळाला आहे. कॉनवेने आपल्या कसोटी कारकीर्दीची पदापर्ण सामन्यात दुहेरी शतक लगावलं. दुसर्या कसोटी सामन्यातही कॉनवेने 80 धावांची खेळी साकारली. त्यामुळे कॉनवेला बाद करणे टीम इंडियासाठी टास्क असेल.
केन विल्यमसन अंतिम सामन्यापूर्वी केन विल्यमसन फीट असल्याने न्यूझीलंडला मोठा दिलासा मिळाला आहे. केन विल्यमसन हा न्यूझीलंडचा सर्वात विश्वासू फलंदाज आहे आणि सध्या तो आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसर्या स्थानावर आहे. विल्यमसनने आपल्या शेवटच्या चार कसोटी सामन्यात दोन शतके ठोकली आहेत. वेगवान गोलंदाजांशिवाय विल्यमसन फिरकीपटूंविरोधातही चांगली खेळी करण्यासाठी ओळखला जातो.