WPL 2023 : ऑस्ट्रेलियाची रन-मशीन आणि सध्या महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये नंबर दोन वर असलेली, बेथ मुनी (Beth moony) हिला महिला प्रीमियर लीग (WPL 2023) मध्ये गुजरात संघाने सामिल करुन घेतलं आहे. गुजरात फ्रँचायझीने तिला 2 कोटी खर्चून आपल्या संघाचा भाग बनवलं आहे. बेथ मूनीची बेस प्राईस 40 लाख रुपये होती. आरसीबी आणि मुंबई इंडियन्सने तिच्यासाठी बोली लावायला सुरुवात केली. जेव्हा ही बोली 1.25 कोटींच्या पुढे गेली तेव्हा दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स फ्रँचायझी देखील या शर्यतीत सामील झाल्या. अखेर गुजरात जायंट्सने 2 कोटींना बेथ मूनीला विकत घेतलं. याशिवाय स्टार खेळाडू एलिस पेरीला आरसीबी संघाने 


बेथ मुनी ही डावखुरी फलंदाज आहे. ती विकेटकीपिंगचीही भूमिका बजावू शकते. 29 वर्षीय बेथ मूनी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खूप धावा करताना याआधी दिसून आली आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, जिथे तिची फलंदाजीची सरासरी 38.98 आहे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये, ती 52.45 च्या उत्कृष्ट सरासरीने धावा करत आहे. बेथ मुनीने जानेवारी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत तिने टी-20 फॉरमॅटमध्ये 78 सामने खेळले आहेत. ज्यात तिने 72 डावांमध्ये 38.98 च्या सरासरीने 2144 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिचा स्ट्राइक रेटही 125+ राहिला आहे. तिने T20 फॉरमॅटमध्ये दोन शतकं आणि 15 अर्धशतकं झळकावली आहेत. एकूणच, गुजरात जायंट्सला T20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक फलंदाज मिळाली आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील बेथचा रेकॉर्ड आणखी मजबूत झाला आहे. 57 एकदिवसीय सामन्यांच्या 52 डावांमध्ये बेथने 52.45 च्या सरासरीने 1941 धावा केल्या. येथे तिचा स्ट्राईक रेट 87.66 आहे. तिने वनडे फॉरमॅटमध्येही तीन शतकं झळकावली आहेत.


ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मागणी


गुजरात जायंट्सने 2 कोटींना बेथ मूनीला विकत घेतलं असून त्यांनी अॅश्ने गार्डनर हिला विकत घेण्यासाठी तब्बल 3.2 कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय स्टार खेळाडू एलिस पेरीला आरसीबी संघाने 1.70 कोटींंना, मेग लॅनिंगला दिल्ली संघाने 1.1 कोटींना, ताहिला मॅग्राथला लखनौ संघाने 1.40 कोटींना विकत घेतलं आहे. याशिवाय अॅलिसा हेली 70 लाखांना लखनौमध्ये, अॅनाबेल सदरलँड 70 लाखमध्ये गुजरात संघात सामिल झाली आहे.


कुणी किती रुपयाला खरेदी केला संघ ? 


महिला प्रीमियर लीगमधील पाच संघासाठी लिलाव काही दिवसांपूर्वी पार पडला. अहमदाबाद संघाला सर्वाधिक बोली लागली होती. अदानी स्पोर्ट्स लाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अहमदाबाद संघाला 1289 कोटी रुपयांत खरेदी केलं. इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मुंबई संघाला 912.99 कोटी रुपयांत खरेदी केलं. महिला आयपीएलमधील तिसऱ्या संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने खरेदी केलं. आरसीबीने बंगलोरसाठी 901 कोटी रुपये मोजलेत. तर दिल्लीच्या संघाला जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 810 कोटी रुपयांत खरेदी केलं. कापरी ग्लोबल होल्डिंग्स यांनी लखनौच्या महिला संघासाठी 757 कोटी रुपये मोजले आहेत. वुमन्स प्रीमियर लीगमधील पाचही संघाची एकूण किंमत 4669.99 कोटी रुपये इतकी झाली आहे. 


हे देखील वाचा-