IND vs AUS 3rd Test : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघ यांच्यात सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका सुरु असून मालिकेतील शेवटचा सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याची तयारी अतिशय जलदगतीने केली जात आहे, कारण ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचणार आहेत. या कसोटी मालिकेतील आतापर्यंत 3 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने पहिले 2 सामने शानदारपणे जिंकले होते, तर तिसरा सामना कांगारू संघाने 9 गडी राखून जिंकला. आता भारतीय संघासाठी मालिकेतील शेवटचा सामना अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरला आहे. कारण टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आपलं स्थान पक्कं करायचं असेल तर हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे.

नॅथन लायन भारतासाठी सर्वात मोठा धोका

इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लायनने एकट्याने भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात 8 गडी बाद करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. या सामन्यातील विजयासह, ऑस्ट्रेलियन संघाने 7 जून रोजी इंग्लंडमध्ये खेळल्या जाणार्‍या ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आपलं स्थान पूर्णपणे पक्के केले आहे. त्यामुळेच आगामी चौथ्या कसोटीतही भारताला लायन मोठा धोक असेल.

कधी, कुठे पाहाल सामना?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा तिसरा कसोटी सामना (India vs Australia 3rdTest) 9 मार्च रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)

सामना तारीख ठिकाण
दुसरा कसोटी सामना 17-21 फेब्रुवारी 2023 दिल्ली
तिसरा कसोटी सामना 1-5 मार्च 2023  धर्माशाला
चौथा कसोटी सामना 9-13 मार्च 2023  अहमदाबाद
पहिला एकदिवसीय सामना 17 मार्च 2023  मुंबई
दुसरा एकदिवसीय सामना 19 मार्च 2023  विशाखापट्टम
तिसरा एकदिवसीय सामना 22 मार्च 2023  चेन्नई

हे देखील वाचा-