World Cup Team India SWOT Analysis : रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया क्रिकेटच्या महाकुंभासाठी सज्ज आहे. 12 वर्षांपासून भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धेत यश मिळाले नाही. भारतीय संघ सध्या वनडेमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाला विश्वचषकाचा पुन्हा एकदा दावेदार म्हटले जातेय. रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. दोघेही करिअरच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. विश्वचषकाआधी भारतीय संघ फॉर्मात आहे, ही जमेची बाजू आहे. जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी दुखापतीनंतर दमदार कमबॅक केलेय. विश्वचषकात उतरलेल्या भारतीय संघाच्या ताकद, कमजोरी अन् कामगिरीबद्दल जाणून घेऊयात....
मागील 12 महिन्यातील भारतीय फलंदाजांची कामगिरीवर एक नजर मारुयात...
Batter | Mat | Runs | Avg | HS | SR | 50/100 |
---|---|---|---|---|---|---|
शुभमन गिल | 26 | 1418 | 64.45 | 208 | 102.01 | 6/5 |
रोहित शर्मा | 17 | 655 | 50.38 | 101 | 109.16 | 6/1 |
विराट कोहली | 18 | 683 | 52.53 | 166 | 115.17 | 1/4 |
श्रेयस अय्यर | 16 | 645 | 53.75 | 113 | 99.38 | 3/2 |
केएल राहुल | 15 | 600 | 60 | 111 | 87.08 | 5/1 |
सूर्यकुमार यादव | 16 | 319 | 24.53 | 72 | 113.93 | 2/0 |
हार्दिक पांड्या | 16 | 372 | 33.81 | 87 | 93.93 | 3/0 |
रविंद्र जाडेजा | 14 | 154 | 25.66 | 45 | 59.68 | 0/0 |
ईशान किशन | 19 | 742 | 49.46 | 210 | 104.65 | 5/1 |
शार्दूल ठाकूर | 20 | 105 | 9.54 | 33 | 83.33 | 0/0 |
ताकद काय ?
फलंदाजी आणि गोलंदाजीत समतोल, ही भारतीय संघाची सर्वात मोठी ताकद आहे. आघाडीच्या तीन फलंदाजांवरच फलंदाजीचा भार, ही बाब आता जुन्ही झाली आहे. आता आघाडीचे फलंदाज फेल ठरले तरी मध्यक्रम अन् तळाचे फलंदाज धावा जमवू शकतात. श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा हे धावा काढण्यात सक्षम आहेत. सातव्या क्रमांकावर रविंद्र जाडेजा विस्फोटक फलंदाजी करण्यास सक्षम आहे.
गोलंदाजीमध्येही विविधता आहे. मोहम्मद सिराज सध्या जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याशिवाय जसप्रीत बुमराहने दमदार कमबॅक केलेय. त्यांच्या जोडीला अनुभवी मोहम्मद शामी आहे. तर फिरकीमध्ये कुलदीप आणि आर. अश्विन यांची कामगिरी झक्कास आहे. त्याशिवाय हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा आणि शार्दूल ठाकूर हे अष्टपैलू खेळाडूही तुफान फॉर्मात आहे. एकूणच काय तर गोलंदाजीतही भारतीय संघ फॉर्मात आहे. मागील 12 महिन्यात भारताच्या गोलंदाजांनी 129 विकेट घेतल्या आहेत.
भारतीय गोलंदाजांची कामगिरी कशी राहिली......
Bowler | Mat | Wickets | Econ | Best | 4W/5W |
---|---|---|---|---|---|
शार्दूल ठाकूर | 20 | 27 | 5.7 | 4/37 | 1/0 |
जसप्रीत बुमराह | 5 | 5 | 4.22 | 2/30 | 0/0 |
मोहम्मद सिराज | 19 | 40 | 4.73 | 6/21 | 2/1 |
कुलदीप यादव | 20 | 38 | 4.66 | 5/25 | 3/1 |
मोहम्मद शामी | 12 | 18 | 5.21 | 5/51 | 0/1 |
आर. अश्विन | 2 | 4 | 4.94 | 3/41 | 0/0 |
रविंद्र जाडेजा | 14 | 12 | 4.6 | 3/37 | 0/0 |
हार्दिक पांड्या | 16 | 16 | 5.24 | 3/3 | 0/0 |
कमजोरी काय ?
आघाडीचे फलंदाज गोलंदाजी करण्यास सक्षम नाहीत, ही भारतीय संघाची दुखरी नस आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल अथवा इशान किशन यांच्यापैकी एकजणही गोलंदाजी करु शकत नाही. त्यामुळे आघाडीचे गोलंदाज फेल ठरल्यानंतर भारताकडे गोलंदाजीचे पर्याय नाहीत.
खराब फिल्डिंग गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाची डोकेदुखी वाढवली आहे.आर. श्रीधर गेल्यानंतर भारतीय संघाच्या फिल्डिंगमध्ये घसरण झाल्याचे दिसतेय. सोपे झेल सोडल्याचेही अनेकदा दिसून आलेय. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत फिल्डिंग महत्वाची ठरणार आहे. खराब फिल्डिंग भारतासाठी चिंतेची बाब ठरत आहे.
रविंद्र जाडेजाची फलंदाजी हा भारतीय संघासमोरील सर्वात मोठा प्रश्न झालाय. रविंद्र जाडेजा तळाच्या फलदाजांना घेऊन धावसंख्या वाढवतो, पण सध्या तो फॉर्मात नाही. त्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे.
संधी काय ?
टीम इंडिया घरच्या मैदानावर विश्वचषकात खेळत आहे, त्यामुळे विश्वचषक जिंकण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. मागील तीन विश्वचषक यजमान संघाने जिंकले आहेत. 2011 भारत, 2015 ऑस्ट्रेलिया आणि 2019 इंग्लंड.. त्यामुळे घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी भारतीय संघाकडे असेल. मागील 12 महिन्यात भारतीय संघाने घरच्या मैदानावर 8 सामने गमावलेत तर 18 सामन्यात बाजी मारली आहे.
धोका काय ?
दुखापत, ही भारतीय संघासाठी सर्वात मोठा धोका आहे. विश्वचषकाआधी जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी दुखापतीनंतर टीम इंडियात कमबॅक केलेय. ते कितपत फिट झालेत, याबाबत सांगता येत नाही. त्यामुळे फिटनेसची चिंता सतावतेय. भारतीय संघाला विश्वचषकासाठी 11 ठिकाणावर 12 हजार किमी प्रवास करायचाय. अशा स्थितीत खेळाडू ताजे आणि फिट राहणे महत्वाचे आहे.
विश्व कप 2023 साठी भारतीय संघ -
फलंदाज : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव
विकेटकीपर: ईशान किशन, केएल राहुल
अष्टपैलू : हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकुर, रविंद्र जाडेजा, आर. अश्विन
वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
फिरकी गोलंदाज : कुलदीप यादव
भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक -
सामना | तारीख | Team 1 | Team 2 | ठिकाण | वेळ |
---|---|---|---|---|---|
Warm-up | Sep 30 | इंडिया | इंग्लंड | Barsapara Cricket Stadium, Guwahati | 2:00 PM |
Warm-up | Oct 3 | इंडिया | Netherlands | Greenfield Stadium, Thiruvananthapuram | 2:00 PM |
5 | Oct 8 | इंडिया | ऑस्ट्रेलिया | MA Chidambaram Stadium, Chennai | 2:00 PM |
8 | Oct 11 | इंडिया | अफगाणिस्तान | Arun Jaitley Stadium, Delhi | 2:00 PM |
13 | Oct 14 | इंडिया | पाकिस्तान | Narendra Modi Stadium, Ahmedabad | 2:00 PM |
17 | Oct 19 | इंडिया | बांगलादेश | MCA Stadium, Pune | 2:00 PM |
21 | Oct 22 | इंडिया | न्यूझीलंड | HPCA Stadium, Hyderabad | 2:00 PM |
29 | Oct 29 | इंडिया | इंग्लंड | Ekana Stadium, Lucknow | 2:00 PM |
33 | Nov 2 | इंडिया | श्रीलंका | Wankhede Stadium, Mumbai | 2:00 PM |
37 | Nov 5 | इंडिया | दक्षिण आफ्रिका | Eden Gardens, Kolkata | 2:00 PM |
43 | Nov 12 | इंडिया | Netherlands | M Chinnaswamy Stadium, Bengaluru | 2:00 PM |