Virat Kohli : विश्वचषकात विराट कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला अन् शेकडो चाहत्यांची निराशा झाली. लखनौच्या मैदानात विराट कोहलीला नऊ चेंडूनंतर विराट कोहली एकही धाव न काढता तंबूत परतला. डेविड विलीने विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ होय. विराट कोहलीकडून चाहत्यांना आज शतकाची अपेक्षा होती, पण कोहली गोल्डन डकचा शिकार झाला. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 48 शतके ठोकली आहेत. सचिनच्या शतकांची बरोबरी करण्यासाठी विराट कोहलीला एका शतकाची गरज आहे. आज लखनौच्या मैदानात विराट कोहली सचिनच्या शतकांची बरोबरी करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. त्यासाठी स्टेडियममध्ये चाहत्यांनी गर्दी केली होती. पण विराट कोहलीला एकाही धाव काढता आली नाही, त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. विराट कोहलीही निराश झाला. बाद झाल्यानंतर विराट कोहलीला राग अनावर आला होता. 


लखनौच्या इकाना स्टेडियमवर 9 चेंडूचा सामना केल्यानंतरही विराट कोहलीला खाते उघडता आले नाही. त्यानंतर शेकडो चाहत्यांसोबत विराट कोहलीही निराश झाला होता. विराट कोहलीला राग अनावर झाला. ड्रेसिंग रुममध्ये विराट कोहलीने राग बाहेर काढला. विराट कोहलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विराट कोहली यामध्ये खुर्दीवर जोरात हाताने मारत असल्याचे दिसतेय. हा व्हिडीओ व्हायरल झालाय. 


पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ - 















सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस?


भारतीय चाहत्यांना विराट कोहलीकडून आज 49 व्या शतकांची अपेक्षा होती, पण चाहत्यांच्या पदरी निराशाच पडली. विराट कोहली शून्यावर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे. विराट कोहली विश्वचषकात पहिल्यांदाच शून्यावर बाद झालाय.  


वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीचे प्रदर्शन


यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली तुफान फॉर्मात आहे. विराट कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला. याआधी विराट कोहलीने तीन अर्धशतके आणि एक शतक ठोकले आहे. विराट कोहलीने सहा सामन्यात 88 च्या सरसरीने 354 धावा केल्या आहेत. आज विराट कोहली खातेही न उघडता बाद झाला.