Suresh Raina : रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषकात भारतीय संघाची गाडी सुसाट जात आहे. भारताने पहिल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवत गुणातिलेकत पहिलं स्थान काबिज केले आहे. फलंदाज, गोलंदाज आणि फिल्डर्स यांनी शानदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाचे भरभरुन कौतुक होतेय. पण यामध्ये रोहित शर्माचा सर्वाधिक वाटा आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वामुळेच भारतीय संघ विजयावर आरुड आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. यामध्ये सुरेश रैना याची भर पडली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने रोहित शर्माची तुलना थेट एमएस धोनीसोबत केली आहे. 


स्पोर्ट्स तकशी बोलताना सुरेश रैना याने रोहित शर्माच्या फलंदाजीसोबत नेतृत्वाचेही कौतुक केले. त्याशिवाय धोनीशी तुलनाही केली. रोहित शर्मा धोनीसारखाच खेळाडूंचा आदर करतो. ड्रेसिंग रुममध्ये तो सर्वांची आपुलकीने वागतो. सर्वांसोबत मैत्रीने राहतो. टीम इंडियात खेळणारे सर्वजण रोहित शर्माचे कौतुक करतात, असे  सुरेश रैना म्हणाला. रोहित शर्मा मैदानावरही तितकाच कूल दिसतो. त्याच्या कूल स्वभावाचे सर्वजण कौतुक करतात. रोहित शर्मा मैदानावरही तितकाच शांत दिसतो. 






रोहित शर्माची विश्वचषकातील कामगिरी - 


यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्माची सुरुवात अतिशय खराब झाली. ऑस्ट्रेलियाविरोधात रोहित शर्माला खातेही उघडता आले नाही. पण त्यानंतरच्या दोन सामन्यात रोहितने खोऱ्याने धावा काढल्या. रोहित शर्माने अनेक विक्रमांना गवसणी घातली. विश्वचषकातील सर्वाधिक शतकांचा विक्रमही मोडला. अफगाणिस्तानविरोधात दिल्लीमध्ये वादळी शतक ठोकले. त्यानंतर अहमबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. 


 विश्वचषकातील भारताची कामगिरी - 


विश्वषकात भारताने दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या तिन्ही सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला आहे. पाच वेळच्या ऑस्ट्रेलियाला भारताने सहज पराभूत केले. ऑस्ट्रेलियाविरोधात सुरुवात अतिशय खराब झाली होती. 2 धावांत तीन फलंदाज तंबूत परतले होते. पण त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल या जोडीने भारताला विजय मिळवून दिला होता. अफगाण संघाला भारताने सहज पराभूत केले होते. रोहित शर्माने शतक ठोकले होते, तर विराट कोहलीने अर्धशतक ठोकले होते. पाकिस्तान संघाचाही सहज पराभव केला. या सामन्यात रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके ठोकली होती. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बुमराह आहे. बुमराहने तीन सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा यांनी मधल्या षटकात धावसंख्या रोखली आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर दडपण वाढत राहिले.