ICC ODI World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेची (South Africa) लॉटरी लागली असून संघ पात्र ठरला आहे. दक्षिण आफ्रिका संघ यावर्षी (2023) भारतामध्ये (India) खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी (ODI World Cup 2023) पात्र ठरला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी एकूण आठ संघ पात्र ठरणार होते. यजमान भारतासह सात संघ आधीच निश्चित झाले होते. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिका एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा हा आठवा आणि शेवटचा संघ ठरला आहे. आयर्लंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर दक्षिण आफ्रिका विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचा मार्ग मोकळा झाला.


दक्षिण आफ्रिकेची एकदिवसीय विश्वचषकात एन्ट्री


आयर्लंड आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. हा सामना रद्द होणे दक्षिण आफ्रिकेसाठी वरदान ठरलं आहे. बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन एकदिवसीय मालिकेतील तीनही एकदिवसीय सामने आयर्लंडने जिंकले असते, तर आयर्लंडचा संघ आपोआपच विश्वचषकासाठी पात्र ठरला असता. पण एक सामना रद्द झाल्यामुळे तसं झालं नाही आणि याचा फायदा दक्षिण आफ्रिकेला झाला. दक्षिण आफ्रिकेने विश्वचषक पात्रता कालावधीत नेदरलँड्सविरुद्ध त्यांचे शेवटचे दोन एकदिवसीय सामने जिंकले आहेत.






दक्षिण आफ्रिका संघासाठी आनंदाची बातमी लॉटरी


आयर्लंड आणि बांगलादेश यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मंगळवारी खेळवण्यात येणार होता. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला. हे दक्षिण आफ्रिकेसाठी वरदान ठरलं आहे. यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेला थेट प्रवेश मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेने आता सुपर लीग टेबलमध्ये आठव्या स्थानावर मजल मारली असून, त्यांना वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे.


विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार


भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये आठ संघ पात्र ठरले आहेत. तसेच, दोन संघ पात्रता फेरीद्वारे स्पर्धेत सामील होतील. पात्र ठरणाऱ्या संघांमध्ये वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या संघांचा समावेश असेल. 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांना पात्रता सामने खेळायचे होते. मात्र, जेव्हा श्रीलंका पात्र ठरली होती आणि वेस्ट इंडिज बाहेर पडला होता.