एक्स्प्लोर

4 संघाचे विश्वचषकातील आव्हान संपले, 3 संघ सेमीफायनलमध्ये, चौथ्या स्थानासाठी तीन संघात स्पर्धा

World Cup 2023 Points Table Update: इंग्लंडने नेदरलँड्सचा पराभव करत स्वतःला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या शर्यतीत कायम ठेवले आहे.

World Cup 2023 Points Table Update: इंग्लंडनं नेदरलँड्सचा 160 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत दुसऱ्या विजयाची नोंद केली. नेदरलँड्सचे विश्वचषकातील आव्हान आज संपुष्टात आलेय. त्याशिवाय श्रीलंका, बांगलादेश आणि इंग्लंड यांचे आव्हान अधीच संपुष्टात आले होते. इंग्लंडने नेदरलँड्सचा पराभव करत गुणतालिकेत सातव्या स्थानी झेप घेतली आहे. त्यासह इंग्लंडने स्वतःला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या शर्यतीत कायम ठेवले आहे. पराभूत झालेल्या नेदरलँड दहाव्या स्थानी घसरलाय. 

तीन संघ निश्चित, एका स्थानासाठी स्पर्धा - 

भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केलाय. चौथ्या स्थानावर तीन संघामध्ये स्पर्धा आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये चौथ्या क्रमांकासाठी लढत आहे. या तीन संघापैकी दोन संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. उपांत्य फेरती कोणता संघ पोहचणार.. याकडे लक्ष लागलेय. 

नेटरनरेटमध्ये न्यूझीलंडचा संघ इतर दोन्ही संघाच्या तुलनेत पुढे आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट + ०.398 आहे. न्यूझीलंडला अखेरचा सामना बेंगलोरमध्ये श्रीलंकेशी होणार आहे. लंकेचे आव्हान संपुष्टात आलेय, ते न्यूझीलंडला अडचणीत आणू शकतात. बेंगलोरमध्ये पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. पाकिस्तान + 0.036) आणि अफगाणिस्तान - 0.038) असा नेट रनरेट आहे.

इंग्लंडची गुणतालिकेत मोठी झेप -

नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव करत इंग्लंडने गुणतालिकेत थेट सातव्या स्थानी झेप घेतली. इंग्लंडला आठ सामन्यात सहा पराभवाचा सामना करावा लागला. दोन विजयासह इंग्लंड संघाने गुणतालिकेत सातव्या स्थानी झेप घेतली. इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका आणि नेदरलँड्स यांचे समान गुण आहेत. पण इंग्लंडचा नेट रनरेट चांगलाय. त्यामुळे ते सातव्या क्रमांकावर आहेत. बांगलादेश आठव्या, श्रीलंका नवव्या आणि नेदरलँड दहाव्या स्थानी आहे. 

इंग्लंडचा विश्वचषकातील दुसरा विजय - 

इंग्लंडनं नेदरलँड्सचा 160 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत दुसऱ्या विजयाची नोंद केली. इंग्लंड आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळं त्या दोन संघांमधला सामना ही निव्वळ औपचारिकता होती. पुण्यातल्या या सामन्यात इंग्लंडनं नेदरलँड्सला विजयासाठी 50 षटकांत 340 धावांचं आव्हान दिलं होतं. पण इंग्लंडच्या प्रभावी आक्रमणासमोर नेदरलँड्सचा अख्खा डाव 179 धावांत गडगडला. इंग्लंडच्या मोईन अली आणि आदिल रशिदनं प्रत्येकी तीन, तर डेव्हिड विलीनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी, बेन स्टोक्सचं शतक आणि ख्रिस वोक्सच्या अर्धशतकच्या जोरावर इंग्लंडनं 50 षटकांत नऊ बाद 339 धावांची मजल मारली होती. बेन स्टोक्सनं 84 चेंडूंत 108 धावांची आणि ख्रिस वोक्सनं 45 चेंडूंत 51 धावांची खेळी उभारली.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 3rd T20I Weather Report : वेलिंग्टनमध्ये मुसळधार पाऊस! भारत-न्यूझीलंड तिसरा टी-20 रद्द होणार?, जाणून घ्या अपडेट
वेलिंग्टनमध्ये मुसळधार पाऊस! भारत-न्यूझीलंड तिसरा टी-20 रद्द होणार?, जाणून घ्या अपडेट
Mumbai Indians IPL 2027 : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्ससोबत डीलची चर्चा; तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी धक्कादायक नावही समोर, कोण आहे तो?
हार्दिक पांड्याची पंजाब किंग्ससोबत डीलची चर्चा; तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी धक्कादायक नावही समोर, कोण आहे तो?
Ashirwad Sooryavanshi Century : वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडमध्ये फ्लॉप, पण भावाने मैदान गाजवलं! 87 चेंडूंत शतक ठोकलं, एकट्याच्या जीवावर संघाला जिंकवलं; VIDEO
वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडमध्ये फ्लॉप, पण भावाने मैदान गाजवलं! 87 चेंडूंत शतक ठोकलं, एकट्याच्या जीवावर संघाला जिंकवलं; VIDEO
Kieron Pollard : मुंबईचं कोचपद मिळताच पोलार्डचा रंग बदलला! सुपर किंग्सला दिला धोका, अर्ध्या वाटेतच सोडली साथ, नेमकं काय घडलं?
मुंबईचं कोचपद मिळताच पोलार्डचा रंग बदलला! सुपर किंग्सला दिला धोका, अर्ध्या वाटेतच सोडली साथ, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
Embed widget