Urvashi Rautela IND vs PAK World Cup 2023 : क्रिकेट अन् उर्वशी रौतेला आता हे नवीन राहिले नाही. आयपीएल सामन्यादरम्यान अथवा भारताच्या महत्वाच्या सामन्यासाठी उर्वशी रौतेला स्टेडियममध्ये हजर राहतेच. ऋषभ पंत आणि पाकिस्तानचा क्रिकेटर नसीम शाह यांच्याशी तिचे नावही जोडले गेले. आजही अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठी उर्वशी रौतेला हिने उपस्थिती लावली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर नेटकऱ्यांनी उर्वशी रौतेला हिला ट्रोल केले. नसीम शाह आणि ऋषभ पंत, हे दोघेही नाहीत, असे म्हणत नेटकऱ्यांनी उर्वशी रौतेला हिला ट्रोल केलेय. 


उर्वशीला स्टेडियममध्ये पाहून चाहत्यांना भारतीय विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत आणि पाकिस्तानी वेगवान गोलंदाज नसीम शाह यांची आठवण झाली. उर्वशीला मैदानात पाहिल्यानंतर चाहत्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिली आहेत. उर्वशीचे स्टेडियममधील फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. उर्वशी रौतेलाच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना एका नेटकऱ्याने म्हटले की, "वापस चलो, नसीम और ऋषभ दोनों नहीं आए हैं." आजच्या सामन्यात ऋषभ पंत आणि नसीम शाह दोघेही नाहीत, मग कोणासाठी आली आहे?, असा प्रश्न अन्य एका नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.


पाहा सोशल मीडियावरील प्रतिक्रिया ....






























 उर्वशीचे चित्रपट
उर्वशीने 2013 मध्ये आलेल्या 'सिंग साब द ग्रेट' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिनं ''सनम रे', 'ग्रेट गँड मस्ती', 'हेट स्टेरी 4' आणि 'पागलपंती' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. उर्वशीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.  उर्वशी ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तिच्या आगामी चित्रपटांची माहिती ती सोशल मीडियावर माध्यमातून देते. तिला इन्स्टाग्रामवर 67.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. वॉलटेर वीरय्या या चित्रपटातील  बॉस पार्टी या आयटम साँगमधील उर्वशीच्या डान्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.