IND vs PAK, World Cup 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला तीन महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलाय. 5 ऑक्टोबरपासून भारतामध्ये दहा संघामध्ये विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे क्रीडा विश्वाचे लक्ष लागलेय. 15 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर लढत होणार आहे. या सामन्यासाठी क्रीडा चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. हॉटेल्स, तिकिट आणि इतर अनेक गोष्टींच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आलेय. 14 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर यादरम्यान अहमदाबादला जाणाऱ्या फ्लाइट्सच्या किंमतीमध्ये तब्बल 300 टक्के इतकी वाढ झाली आहे.
फ्लाइट्स तिकिटामध्ये 300 टक्केंची वाढ -
तुम्ही 14 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर यादरम्यान फ्लाइट्सने अहमदाबादला जायचा विचार करत असाल तर तुम्हला 300 टक्के अधीक पैसे खर्च करावे लागतील. या तारखेला मुंबई ते अहमदाबाद जाणाऱ्या फ्लाईट्सचे तिकिट 22 हजार रुपये इतके करण्यात आलेय. दिल्लीवरुन अहमदाबादला जायचे असेल तर तिकिटाची किंमत 21 हजार रुपये इतकी आहे. 14 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर यादरम्यान कोलकाता ते अहमदाबादसाठी फ्लाइट्स तिकिट 42 हजार रुपये इतके झालेय. तर बेंगलोरवरुन जायचे असल्यास फ्लाइट्स तिकिट 18 हजार रुपये इतके आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्यामुळे फ्लाइट्सच्या तिकिटामध्ये तब्बल 300 टक्केंनी वाढ झाली आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यासाठी क्रीडा चाहत्यामध्ये उत्सुकता -
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला दोन ते तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. पण फ्लाइट् तिकिटाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. हैदराबाद ते अहदाबाद या फ्लाइट्सच्या तिकिटाची किंमत 35 हजार रुपये इतकी आहे. तर चेन्नईवरुन अहमदाबादला जाणाऱ्या 45 हजार रुपये मोजावे लागणार आहे. 14 ते 16 ऑक्टोबरदरम्यान चंदीगढ ते अहमदाबाद फ्लाईट्स तिकिट 24 हजार रुपये मोजावे लागतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 15 ऑक्टोबरला विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघामध्ये फक्त आयसीसीच्या स्पर्धेमध्येच लढत होते. त्यामुळे या लढतीकडे जगभरातील क्रीडाप्रेमींचं लक्ष असते. क्रीडा चाहते आतुरतेने या सामन्याकडे पाहताता. भारतात होणाऱ्या विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. 19 नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना होणार आहे.
आणखी वाचा :