Richest-Ever Pakistani Cricketer : पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण ? पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची संपत्ती किती ? बाबर आझम पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे का ? याबाबतचे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहेत.. काही जणांनी याबाबत गुगलवर सर्च करत उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूमध्ये बाबार आझम, शाहीन आफ्रिदी अथवा शोएब अख्तर यांची नावे नाहीत. जर यापैकी एकही खेळाडू सर्वात श्रीमंत नाही, तर पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू कोणता ?


पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण ? (Who is pakistan richest cricketer)


blog.siasat.pk. च्या रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत क्रिकेटर माजी कर्णधार इम्रान खान आहेत.  इमरान खान यांची संपत्ती जवळपास 70 मिलियन अमेरिकीन डॉलर इतकी आहे. पाकिस्तानच्या रुपयात ही किंमत जवळपास 10.9 बिलियन इतकी आहे. माजी कर्णधार इम्रान खान पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत खेळाडूमध्ये अव्वल स्थानावर आहेत. पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत बाबर आझम अव्वल दहा खेळाडूमध्येही सामील नाही.  पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी पाकिस्तानचा दुसरा श्रीमंत क्रिकेटपटू आहे. माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीची संपत्ती 7.3 बिलियन पाकिस्तान रुपये इतकी आहे. 


पाकिस्तानचे टॉप-5 श्रीमंत क्रिकेटपटू कोणते ?


2021 च्या आकडेवारीनुसार, इम्रान खान पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे तर शाहीद आफ्रिदी दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिचा पती शोएब अख्तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. शोएब अख्तरची संपत्ती 3.6 बिलियन इतकी आहे. चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या मोहम्मद हफीज याची संपत्ती 3.6 बिलियन इतकी आहे. अजहर अली पाचव्या क्रमांकावर आहे.  अजहर अली याची संपत्ती 2.3 बिलियन इतकी आहे. हे सर्व आकडे 2021 मधील आहे. मागील तीन वर्षांमध्ये बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्या प्रसिद्धीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याच्या आकडेवारीमध्ये बाबार आझम अथवा शाहीन आफ्रिदी यासारख्या क्रिकेटपटूचा टॉप 10 श्रीमंत खेळाडूमध्ये समावेश असू शकतो.  रिपोर्ट्सनुसार, बाबार आझमची कमाई विराट कोहलीच्या 12 पट कमी आहे.






आणखी वाचा :


World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ, फ्लाईट्स तिकिटात 300 टक्केंनी वाढ, मुंबई-अहमदाबादचे तिकिट 22 हजार रुपये


विश्वचषकाआधी टीम इंडियासाठी खूशखबर, 4 महत्वाचे खेळाडू दुखापतीतून सावरले, लवकरच करणार कमबॅक