World Cup 2023 : चेन्नई येथे झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने आणखी एक उलटफेर केला आहे. अफगाणिस्तान संघाने अफगाणिस्तानचा आठ विकेटने पराभव केला. पाकिस्तानला 283 धावांत रोखल्यानंतर हे आव्हान 49 व्या षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. अफगाणिस्तान संघाने याआधी गतविजेत्या इंग्लंड संघाचा पराभव केला होता. 284 धावांच्या धावांचा बचाव करताना पाकिस्तानच्या फिल्डर्सनी खराब फिल्डिंग केली. सोपे झेल सोडले, त्यामुळे अफगाणिस्तान संघाने सहज विजय मिळवला. गुरबाज 65, जादरन 87 धावांचे योगदान दिले. तर रहमत शाह याने नाबाद 77 धावांची मॅचविनिंग खेळी केली. कर्णधार शाहीदीनेही नाबाद 44 धावांचे योगदान दिले.
अफगाणिस्तानच्या जिगरबाज संघानं पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, यंदाच्या विश्वचषकात दुसरा पराक्रम घडवला आहे. अफगाणिस्ताननं याच विश्वचषकात गतविजेत्या इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव करून मोठी खळबळ निर्माण केली होती. त्यापाठोपाठ आता अफगाणिस्ताननं पाकिस्तानलाही लोळवण्याची कामगिरी बजावली आहे. या सामन्यात पाकिस्ताननं अफगाणिस्तानला विजयासाठी ५० षटकांत २८३ धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी यशस्वी पाठलाग केला. रहमान उल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, रहमत शाह आणि कर्णधार हशमत आफ्रिदीनं जबाबादारीनं खेळ करून आपल्या संघाला एक मोठा विजय मिळवून दिला आहे.
पाकिस्तानची 283 धावांपर्यंत मजल
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत 7 गडी गमावून 282 धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने 92 चेंडूत सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. याशिवाय सलामीवीर अब्दुल्ला शफीकने 50 धावांचा टप्पा ओलांडला. अब्दुल्ला शफीकने 75 चेंडूत 58 धावा केल्या. या सलामीवीराने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. पाकिस्तानचे सलामीवीर अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक यांनी 10.1 षटकात 56 धावा जोडल्या. इमाम उल हक 22 चेंडूत 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी विश्वचषकात सतत धावा करत असलेला पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान 10 चेंडूत 8 धावा करून गेला. सौद शकीलने 34 चेंडूत 25 धावांचे योगदान दिले.
इफ्तिखार अहमद आणि शादाब खान यांनी शेवटच्या षटकांमध्ये शानदार फलंदाजी केली. इफ्तिखार अहमद आणि शादाब खान यांच्यात ७३ धावांची भागीदारी झाली. इफ्तिखार अहमदने 27 चेंडूत 40 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 4 षटकार मारले. तर शादाब खानने 38 चेंडूत 40 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर नूर अहमद हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. नूर अहमदने 10 षटकांत 49 धावा देत तीन खेळाडूंना आपला बळी बनवले. नवीन उल हकने पाकिस्तानच्या 2 फलंदाजांना बाद केले. याशिवाय मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाई यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.