Josh Baker News : क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. इंग्लंडच्या अवघ्या 20 वर्षाच्या खेळाडूचं निधन झाले आहे. वूस्टरशायरचा फिरकी गोलंदाज जोश बेकर याचे वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी निधन झाले. या बातमीने क्रीडा जगताला धक्का बसला आहे. जोश बेकरने यानं 19 एप्रिल रोजी अखेरचा सामना खेळला होता. यंदाच्या हंगामात त्यानं दोन काउंटी सामन्यात शानदार कामगिरी केली. जोश बेकर यानं 19 एप्रिल रोजी किडरमिन्स्टरमध्ये डरहमविरुद्ध खेळताना दिसला होता. पण त्यानंतर त्याचं दुर्वेदी निधन झालेय. 


जोश बेकर यानं 2021 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जोश बेकरने आतापर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये 47 सामने खेळले. ज्यामध्ये जोश बेकरने शानदार कामगिरी करत 70 विकेट नावावर केल्या. जोश बेकर इंग्लंडकडून अंडर-19 खेळला आहे. जोश बेकर याचं निधन नेमकं कशामुळं झालं, याबाबत सस्पेंस आहे. वूस्टरशर क्लबने जोश बेकरच्या मृत्यूची माहिती दिली आहे, परंतु या खेळाडूचा मृत्यू कशामुळे झाला, हे उघड केले नाही.






जोश बेकर याच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. जोश बेकर याचा दोन आठव्यानंतर वाढदिवस होता, पण त्याआधीच त्यानं जगाचा निरोप घेतला. बकर याचा जन्म 16 मे 2003 रोजी वूस्टरशायर येथे झाला. त्यानं इंग्लंडकडून अंडर 19 संघाचं प्रतिनिधित्व केलेय.






बुधवारीच घेतल्या 3 विकेट - 


बुधवारी झालेल्या ब्रॉम्सग्रोव्ह स्कूलमध्ये सॉमरसेट विरुद्ध काउंटी सेकंड इलेव्हनच्या सामन्यात बेकर यानं शानदार कामगिरी केली होती. या सामन्यात त्यानं तीन विकेट घेतल्या होत्या. इंग्लंडचे माजी फिरकीपटू आणि प्रशिक्षक जाईल्स यांनीही जोश बेकर याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. गाइल्स यांनी सोशल मीडियावर म्हटलेय की, “जोश हा चांगला सहकारी होता. आम्हाला सर्वांना त्याची खूप आठवण येईल.”