India vs Ireland, Women T20 WC 2023 : महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि आयरलँड यांच्यात सामना सुरु आहे.  भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. हमरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 


टी 20 विश्वचषकातील भारताचा हा चौथा सामना आहे. तीन सामन्यापैकी भारताने दोन सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव स्विकारलाय. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्याविरोधात भारताने विजय मिळवला होता. तर इंग्लंडविरोधात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. 


भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा हा 150 वा टी 20 सामना आहे. असा पराक्रम करणारी हरमनप्रीत पहिली महिला खेळाडू आहे. बीसीसीआयने हरमनप्रीत कौर हिचे कौतुक केले आहे. 






भारत आणि आयरलँड ची प्लेईंग 11 कशी आहे. कुणाला संधी मिळाली, पाहा डिटेल्स  


आयरलँड महिला (प्लेइंग इलेवन) : एमी हंटर, गेबी लुईस, ओर्ला प्रेंडरगैस्ट, आयमर रिचर्डसन, लुईस लिटिल, लॉरा डेलनी (कर्णधार), अर्लीन केली, मॅरी वाल्ड्रॉन (विकेटकीपर), लिआह पॉल, कारा मरे, जॉर्जीना डेम्पसे






भारत महिला (प्लेइंग इलेवन) : स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंह






राधा यादवच्या जागी देविकाला संधी - 
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्लेईंग 11 मध्ये राधा यादव हिच्या जाही देविकाला संधी देण्यात आली आहे. 


आणखी वाचा :


IND vs AUS : कर्णधार मायदेशी परतला, आता आणखी दोन खेळाडू मालिकेबाहेर, पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या