Deepti Sharma Womens T20 World Cup 2023 IND W vs WI W : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या टी 20 विश्वचषकात भारताने वेस्ट इंडिजचा सहा गड्यांनी पराभव केला. हा भारताचा दुसरा विजय होता. दमदार कामगिरीमुळे दिप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारने गौरवण्यात आले. या सामन्यात दिप्तीने 4 षटकात 15 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घतल्या. यासह दिप्ती शर्मानं मोठ्या विक्रमला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये 100 विकेट घेण्याचा पराक्रम दिप्तीने केला आहे. असा पराक्रम करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. पुरुष क्रिकेटमध्येही आतापर्यंत एकाही गोलंदाजाला 100 विकेट घेतला आल्या नाहीत. युजवेंद्र चहल याने सर्वाधिक 91 विकेट घेतल्या आहेत.
दिप्तीने आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये 100 विकेट घेण्याचा पराक्रम केल्यानंतर बीसीसीआय आणि आयसीसीने ट्वीट करत कौतुक केले आहे. त्याशिवाय नेटकऱ्यांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
महिला टी 20 विश्वचषकात भारताने वेस्ट इंडिजचा सहा विकेट्सने पराभव केला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण दिप्ती शर्माच्या भेदक माऱ्यापुढे वेस्ट इंडिजचा संघ 118 धावांपर्यंत मजल मारु शकला. दिप्तीने चार षटकात 15 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. या भन्नाट कामगिरीमुळे दिप्तीला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दीप्तिने एकाच षटकात टेलर आणि केंपबेल यांना बाद केले. तर आपल्या अखेरच्या षटकात फ्लेचरला तंबूचा रस्ता दाखवला.
दीप्तीने आतापर्यंत 89 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये तिने 100 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. यादरम्यान 10 धावा देत 4 विकेट ही तिची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारी दिप्ती पहिली भारतीय खेळाडू आहे. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मद हिच्या नावावर आहे. अनिसाने 117 सामन्यात 125 विकेट्स घेतल्या आहेत. भारताकडून दिप्तीनंतर पूनम यादव हिने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. पूनम यादव हिने 72 सामन्यात 98 विकेट्स घेतल्या आहे. पूनम आयसीसीच्या क्रमवारीत 10 व्या क्रमांकावर आहे. तर दिप्ती नवव्या क्रमांकावर विराजमान आहे. राधा यादवने 65 सामन्यात 67 विकेट्स घेतल्या आहेत.