Womens IPL 2023 : महिला प्रीमियर लीगचा (Womens IPL) लिलाव सुरू आज मुंबईत पार पडत आहे.. स्मृती मंधानावर आज सर्वात मोठी बोली लागली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तिच्यावर तब्बल 3.4 कोटी रुपयांची बोली लावली आणि तिला आपल्या संघात समाविष्ट केलं. बंगळुरू व्यतिरिक्त, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांनी देखील आतापर्यंत एकापेक्षा अधिक खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपये मोजले आहेत. तर आतापर्यंत कोणत्या खेळाडूंना कोणत्या फ्रेंचायझीने खरेदी केलं आहे आणि त्यांचा संघ किती मजबूत दिसत आहे, ते पाहूया...


आतापर्यंत कोणत्या फ्रँचायझीने कोणत्या खेळाडूला घेतलं विकत?


दिल्ली कॅपिटल्स - जेमिमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, मारिजन कॅप, मेग लॅनिंग, शिखा पांडे, राधा यादव आणि तीतास साधू


गुजरात जायंट्स - अॅशले गार्डनर, बेथ मुनी, स्नेह राणा, अॅनाबेल सदरलँड, डॉटिन, सोफिया डंकले आणि हरलीन देओल


मुंबई इंडियन्स - नताली सायव्हर, पूजा वस्त्राकर, हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया आणि अमेलिया केर


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - स्मृती मांधना, ऋचा घोष, एलिसा पेरी, रेणुका सिंग आणि सोफिया डिव्हाईन


यूपी वॉरियर्स - दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टन, ताहलिया मगरा, शबनीम इस्माईल, एलिसा हिली, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, श्वेता सेहरवत, पार्श्वी चोप्रा आणि यशश्री


अलाना किंग आणि अटापट्टू राहिले अनसोल्ड


ऑस्ट्रेलियाची स्टार फिरकीपटू आणि सध्या जगातील सर्वोत्कृष्ट महिला फिरकीपटू मानली जाणारी अलाना किंग हिला महिला प्रीमियर लीगमध्ये कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतलं नाही. असा अंदाज वर्तवला जात होता की सर्व फ्रँचायझी किंगवर मोठी बोली लावू शकतात, परंतु तसं झालं नाही आणि त्यांना एकही खरेदीदार सापडला नाही. अलाना व्यतिरिक्त, श्रीलंकेची अनुभवी स्फोटक फलंदाज चमारी अटापट्टूलाही कोणी खरेदीदार मिळाला नाही. चमारी ही जगातील सर्वोत्तम टी-20 महिला फलंदाजांपैकी एक मानली जाते. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये तिची सहज विक्री होईल अशीही प्रत्येकाला आशा होती, जरी असे घडले नाही आणि तिच्यावर कोणत्याही फ्रेंचायझीने बोली लावली नाही.


महिला प्रीमियर लीग लिलावामधील सर्व फ्रँचायझींच्या पर्समध्ये जास्तीत जास्त 12 कोटी रुपये उपलब्ध आहेत. प्रत्येक फ्रँचायझीला किमान 9 कोटी रुपये खर्च करावे लागतील. या रकमेत संघाला किमान 15 आणि जास्तीत जास्त 18 खेळाडू खरेदी करावे लागतील. प्रत्येक फ्रँचायझी त्यांच्या संघात जास्तीत जास्त 6 परदेशी खेळाडूंचा समावेश करू शकते. या लिलावात एकूण 409 खेळाडू सहभागी होत असून त्यात 246 भारतीय आणि 163 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावात 163 परदेशी खेळाडूंपैकी 8 सहयोगी देशांचे खेळाडूही सहभागी होणार आहेत.


हे देखील वाचा-