India vs West Indies : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 2 गडी राखून शानदार असा विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसरा सामना जिंकत भारताने मालिकेतही 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. दरम्यान या सामन्यात भारताच्या सर्वच खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. पण नाबाद 64 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या अक्षरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. दरम्यान या विजयानंतर अक्षरने आवेश खानसोबत मिळून संघातील सर्वांचा लाडका आणि मुख्य फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या खास सेलिब्रेशन पोजमध्ये विजयाचा आनंद साजरा केला.


यावेळी अक्षर आवेशसोबत स्वत: चहलही होती. हे सेलिब्रेशन म्हणजे तिच विशेष स्टाईल ज्यामध्ये बसलेला, चहलचा फोटो काही वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता. 2019 सालच्या विश्वचषकात भारताचा सामना सुरु असताना चहल सीमारेषेपलीकडे अतिरिक्त खेळाडू म्हणून बसला असताना अगदी निवांत स्टाईलमध्ये बसला होता. ज्यानंतर त्याच्या या फोटोचे अनेक मीम्स तयार झाले होते. पण त्यानंतर अलीकडे पार पडलेल्या आयपीएलमध्ये एक दमदार हॅट्रिक चहलने घेतल्यानंतर तिच स्टाईल त्याने थेट मैदानात मारत सर्व मीम्स तयार करणाऱ्यांना हटके उत्तर दिलं. त्यानंतर आता अक्षर आवेशनेही हे सेलिब्रेशन केलं आहे.


रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय


वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शाय होपच्या शतकाच्या बळावर वेस्ट इंडिजने निर्धारित 50 षटकांत सहा गडी गमावून 311 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं दोन विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयात महत्वाची भूमिका बजावणारा अक्षर पटेलला (35 चेंडूत 64 धावा) सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. 


हे देखील वाचा-