Womens Asia Cup 2022: भारतीय महिला क्रिकेट संघानं शनिवारी आशिया चषक 2022 स्पर्धेतील त्यांच्या पाचव्या सामन्यात गतविजेत्या बांगलादेशचा 59 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं 5 विकेट्स गमावून बांग्लादेशसमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर बांगलादेशला निर्धारित 20 षटकात 100 धावांवर रोखलं. भारताच्या विजयात शेफानी वर्मानं महत्वाची भूमिका बजावली. तिनं फलंदाजीसह गोलंदाजीतंही मोलाचं योगदान दिलं.