FIH Player of the Year 2022: भारतीय हॉकी संघाचा (Indian's Hockey Team) डिफेंडर आणि उपकर्णधार हरमनप्रीत सिंह (Harmanpreet Singh) सलग दुसऱ्या वर्षी एफआयएच 'प्लेयर ऑफ द इयर' (Player Of The Year) म्हणून गौरवण्यात आलं. पुरूष गटात सलग दोन वर्ष सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकणारा हरमनप्रीत हा चौथा खेळाडू आहे. तसेच तो नेदरलँडचा ट्युने डी नूझियर, ऑस्ट्रेलियाचा जेमी ड्वायर आणि बेल्जियमचा आर्थर व्हॅन डोरेन यांच्या एलिट लिस्टमध्ये सामील झालाय.
ट्वीट-
"हरमनप्रीत आधुनिक काळातील हॉकी सुपरस्टार आहे. तो एक हुशार बचावपटू आहे ज्याच्याकडे प्रतिस्पर्ध्याला पछाडण्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचण्याची त्याच्यात क्षमता आहे. त्याची 'ड्रिब्लिंग' क्षमता शानदार आहे. तो खूप गोलही करतो. यामुळं त्याची सलग दुसऱ्या वर्षी एफआयएचचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आलीय", असं एफआयएचनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
हरमनप्रीत सिंहची दमदार कामगिरी
हरमनप्रीतने (26 वर्षे) एकूण 29.4 गुण मिळवले. त्यानंतर थियरी ब्रिंकमननं 23.6 आणि टॉम बूननं 23.4 गुण मिळवले. भारतीय उपकर्णधार हरमनप्रीतनं एफआयएच हॉकी प्रो लीग 2021-22 मध्ये दोन हॅटट्रिकसह 16 सामन्यांमध्ये 18 गोल केले आहेत.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हरमनप्रीत सिंहचं प्रदर्शन
हरमनप्रीत सिंह हा भारतासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू राहिलाय. तसेच प्रो लीगच्या एकाच हंगामात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. हरमनप्रीतनं गेल्या वर्षी ढाका येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी करून दाखवली होती, त्यानं सहा सामन्यांमध्ये आठ गोल केले. प्रत्येक सामन्यात त्यानं गोल केला होता.
हे देखील वाचा-