Happy Birthday Rahul Dravid: भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आज त्यांचा 49 वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळणार आहे. केपटाऊनच्या मैदानावर विजय मिळवून भारतीय संघ द्रविडला वाढदिवसाची भेट देऊ इच्छितो. तीन सामन्याच्या मालिकेत दोन्ही संघानं 1-1 सामना जिंकला आहे. यामुळं तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात विजय मिळवून मालिकेवर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील. 


राहुल द्रविडचा 11 जानेवारी 1973 रोजी मध्य प्रदेशच्या इंदोर येथे जन्म झालाय. राहुल द्रविडनं 16 वर्ष भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्याच्याकडं 2005 मध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानं 2007 साली कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 2012 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. राहलनं त्याच्या 16 वर्षाच्या कारकिर्दीत प्रभावी कामगिरी, नम्र आणि मोहक व्यक्तिमत्त्वानं जगभरातील चाहत्यांचे मन जिंकले आहेत. 


कू-





 


ऑस्ट्रेलियाविरुद्ध 180 धावा
भारताने 2000 साली ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजयाची नोंद केली. हा भारतीय संघाचा सर्वात मोठा कसोटी विजय मानला जातो. या विजयात राहुल द्रविडनं मोलाचा वाटा उचलला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला फॉलोऑन खेळण्यास भाग पाडलं. यानंतर द्रविडनं लक्ष्मणसोबत शानदार भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. दोघांनी मिळून 386 धावांची भागीदारी केली होती. त्यावेळी लक्ष्मणनं 280 तर, राहुल द्रविडनं 180 धावांची खेळी केली. भारतानं हा सामना 171 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर चेन्नईतील पुढील कसोटी जिंकून भारताने मालिका जिंकली.


ऑस्ट्रेलियात 233 धावांची खेळी
राहुल द्रविडनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2003 मध्येही 233 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 566 धावांची मोठी धावसंख्या उभारली. या सामन्यातही राहुल द्रविड आणि लक्ष्मणनं चांगली फलंदाजी केली. या दोघांनी 303 धावांची भागीदारी केली होती. ज्यात लक्ष्मणनं 148 धावांची खेळी केली होती. अखेरिस भारताला सामना जिंकण्यासाठी 233 धावांची गरज असताना द्रविडं दुसऱ्या डावातही नाबाद 72 धावा केल्या. हा सामना भारतानं चार विकेट्स राखून जिंकला होता. 


पाकिस्तानविरुद्ध 270 धावा 
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत द्रविडनं 270 धावांची शानदार खेळी करत आपल्या संघाला विजयापर्यंत नेलं. तीन कसोटी सामन्याच्या मालिकेत दोन्ही संघानं एक-एक सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पाकिस्तानला 224 धावांत गुंडाळलं. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतानं 600 धावांचं डोंगर उभारलं. या सामन्यात राहुल द्रविडनं 270 धावांची केली होती. या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 131 धावांनी विजय मिळवला होता.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha