Eng vs Ind 1st Test : ऋषभ पंत पुरता फसला, शुभमन गिलच्या काळ्या मोजेनंतर चेंडूवरून राडा, ICC उपकर्णधारावर घालणार बंदी?
England vs India 1st Test : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या अडचणी काही संपत नाहीत.

Rishabh Pant Argument with Umpire : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या अडचणी काही संपत नाहीत. हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या दिवशी जेव्हा भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिल काळे मोजे घालून मैदानावर आला, तेव्हा गिलने आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गोंधळ उडाला. तो वाद संपला नव्हता, त्यात हेडिंग्ले येथे तिसऱ्या दिवशी उपकर्णधार ऋषभ पंतची पंचांशी भांडण झाली.
हेडिंग्ले कसोटीच्या तिसऱ्या दिवशी हॅरी ब्रूक फलंदाजी करत असताना, भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत चेंडू घेऊन पंचांकडे गेला आणि त्याला काहीतरी बोलू लागला. यादरम्यान, दोघांमध्ये काही वाद झाला, ज्यामुळे पंतने रागाने चेंडू सिराजकडे फेकला. पण पंतच्या या कृत्यासाठी त्याच्यावर बंदी घातल्या जाऊ शकते का? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
ही घटना 61 व्या षटकात घडली, जेव्हा मोहम्मद सिराज हॅरी ब्रूकविरुद्ध गोलंदाजी करत होता. दरम्यान, हॅरी ब्रूकने सिराजच्या चेंडूवर जबरदस्त चौकार मारला. यानंतर सिराजने पंचांना चेंडू बदलण्यास सांगितले. ज्याला पंचांनी नकार दिला. सिराजनंतर पंतही तोच अपील घेऊन पंचांकडे पोहोचला. त्याने पंच क्रिस गॅफनी यांना चेंडू बदलण्यास सांगितले, पण त्यांची मागणी फेटाळण्यात आली. मग काय, पंत संतापला आणि त्याने पंचांकडे पाहत चेंडू फेकला.
आयसीसी नियम काय म्हणतो?
पंतची ही कृती पाहून मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी त्याच्याविरुद्ध हुल्लडबाजी सुरू केली. ऋषभ पंतची ही कृती आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन ठरू शकते. कलम 2.8 नुसार, जर एखाद्या खेळाडूने पंचांच्या निर्णयाशी असहमती दर्शविली तर ती लेव्हल 1 किंवा लेव्हल 2 गुन्हा म्हणून वर्गीकृत केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, खेळाडूला दंड किंवा बंदी येऊ शकते.
आयसीसी नियमांनुसार कलम 2.9 मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, जर एखाद्या खेळाडूने अयोग्य पद्धतीने पंचांसोबत काही केले तर त्याला शिक्षा होऊ शकते. या अंतर्गत देखील लेव्हल 1 आणि लेव्हल 2 ची शिक्षा लागू केली जाऊ शकते.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, हेडिंग्ले कसोटी अतिशय रोमांचक वळणावर आली आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 471 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडनेही पहिल्या डावात 465 धावा केल्या होत्या. टीम इंडियाला दुसऱ्या डावात 6 धावांची आघाडी होती. तिसऱ्या दिवशी, टीम इंडियाने दुसऱ्या डावात सुरुवात केली आणि 2 विकेट गमावून 90 धावा केल्या आहेत.
हे ही वाचा -





















