PAK vs NZ 1st Test: पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यात कराची (Karachi) येथे पहिला कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात बाबर आझमनं (Babar Azam) दमदार फलंदाजी करत शतक झळकावलं. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील नववं शतक ठरलंय. या कामगिरीसह त्यानं मोहम्मद युसूफचा (Mohammad Yousuf) 16 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. तसेच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मालाही (Rohit Sharma) मागं टाकलंय. 

या सामन्यात बाबरनं अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यानं या सामन्यात 13 धावा करताच पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफचा 16 वर्ष जुना विक्रम मोडला. बाबर आता कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅट्स एकत्र करून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. याबाबतीत त्यानं युसूफचा विक्रम मोडला. युसूफनं 2006 मध्ये 33 सामन्यात 2 हजार 435 धावा केल्या होत्या. त्याचवेळी, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळण्यापूर्वी बाबरच्या नावावर 43 सामन्यात 2 हजार 423 धावांची नोंद होती.

विराट कोहली, रोहित शर्माला टाकलं मागंबाबरनं युसूफलाच नाही तर भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीलाही मागं सोडलं. हे दोघंही 2019 मध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू ठरले होते. रोहितनं त्या वर्षी 47 सामन्यांत 2 हजार 442 धावा केल्या होत्या. त्याचवेळी कोहलीनं 44 सामन्यात 2 हजार 455 धावा केल्या होत्या.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा (तिन्ही फॉरमॅट एकत्रित करून)
फलंदाजवर्षसामनेधावा
कुमार संगकारा (श्रीलंका) 2014482868
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)2005462833
विराट कोहली (भारत)2017462818
विराट कोहली (भारत)2018372735
केन विलियम्सन (न्यूझीलंड)2015392692
एंजलो मॅथ्यूज (श्रीलंका)2014532687
रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया)2003452657
राहुल द्रविड (भारत)1999532626
कुमार संगकारा (श्रीलंका)2006502609
विराट कोहली (भारत)2016372595
बाबर आजम (पाकिस्तान)2022442584*
सौरव गांगुली (भारत)1999512580
जो रूट (इंग्लंड)2016412570
तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका)2009422568
सचिन तेंदुलकर (भारत)1998392541
विराट कोहली (भारत)2019442455
सनथ जयसूर्या (श्रीलंका)1997372449
रोहित शर्मा (भारत)2019472442
कुमार संगकारा (श्रीलंका)2009502436
मोहम्मद यूसुफ (पाकिस्तान)2006332435
 

हे देखील वाचा-