WI vs AUS Match Highlights: वेस्ट इंडिज (West Indies) आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप सुरु होत असून त्यापर्वी सराव सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. यजमान वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात सराव सामना पार पडला. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियाला दणका दिला आहे. वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियावर 35 धावांनी विजय मिळवला आहे.


पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सराव सामना पार पडला. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या अंगलट आला. वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 4 विकेटवर 257 धावा केल्या. तर, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटवर 222 पर्यंत मजल मारता आली.  


टी-20 वर्ल्ड कप 2024 पूर्वी वॉर्म अप मॅचेसमधील वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत रोमांचक ठरली. वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 257 धावा केल्या. यामध्ये सर्वाधिक धावा निकोलस पूरननं केल्या, त्यानं 25 बॉलमध्ये 5 चौकार आणि 8 षटकारांसह 75 धावा केल्या. कॅप्टन रोवमन पॉवेलनं 25 बॉलमध्ये 4  चौकार आणि 4 षटकारांसह 52 धावा केल्या. शेरफेन रदरफोर्डनं 18 बॉलमध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 47 धावा केल्या.  


ऑस्ट्रेलियाचा 35 धावांनी पराभव


ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 258 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाचा संघ 20 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 222 धावा करु शकला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का वॉर्नरच्या रुपानं बसला. डेव्हिड वॉर्नरनं 1 षटकार आणि दोन चौकारासह त्यानं 6 बॉलमध्ये 15 धवा केल्या.एश्टन एगर केवळ 28 धावा करु शकला. तर, मिशेल मर्श 4 धावा करुन बाद झाला.   


ऑस्ट्रेलियाकडून चौथ्या विकेटसाठी जोस इंग्लिस आणि टीम डेविडनं 53 धावांची भागिदारी केली. टीम डेविडनं 25 धावा केल्या. यानंतर मॅथ्यू वेड 25 धावा  करुन बाद झाला. यानंतर जोस एलिसनं 55 धावांची आक्रमक फलंदाजी करुन बाद झाला. यानंतर नाथन एलिस देखील 39 धावा करुन बाद झाला.  


दरम्यान, वेस्ट इंडिजनं दोनवेळा टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवलं आहे. तर, ऑस्ट्रेलियानं एकदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे.


संबंधित बातम्या : 



Ricky Ponting On T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा अन् विकेट्स कोण घेणार?; रिकी पाँटिंगने केली मोठी भविष्यवाणी