Virender Sehwag On IND Vs PAK Match: पाकिस्तानच्या विजयानंतर वीरेंद्र सेहवाग का भडकला? कारण आले समोर
IND Vs PAK: भारत ज्या गटात आहे, त्याला ग्रुप ऑफ डेथ असे म्हटले जाते. पाकिस्तान विरोधात पराभव स्वीकारल्यानंतर भारताचा पुढील सामना न्यूझीलंडच्या आणि अफगाीस्तानसोबत होणार आहे.
![Virender Sehwag On IND Vs PAK Match: पाकिस्तानच्या विजयानंतर वीरेंद्र सेहवाग का भडकला? कारण आले समोर Why Virender Sehwag got angry after Pakistan's victory Virender Sehwag On IND Vs PAK Match: पाकिस्तानच्या विजयानंतर वीरेंद्र सेहवाग का भडकला? कारण आले समोर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/2/2016/03/07214432/Virender-Sehwag-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
युएईत (UAE) सुरु झालेल्या टी-20 विश्वचषकात भारताची पराभवाने सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने (India Vs Pakistan) भारतावर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. भारताकडून मिळालेल्या 152 धावांचे लक्ष्य कर्णधार बाबर आझम आणि त्याचा सहकारी मोहम्मद रिझवानने सहज पूर्ण केले. तसेच भारताचा विजयी रथ तब्बल 29 वर्षांनंतर रोखला. परंतु, भारताच्या पराभवानंतर माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) संतापजनक ट्वीट केले. या ट्विटच्या माध्यमातून त्याने अनेक प्रश्न उपस्थित केले.
विश्वचषकातील हाय व्होल्टेज सामन्यात भारताला पाकिस्तान विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र, भारताच्या पराभवानंतर देशातील विविध भागात फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावर वीरेंद्र सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. "दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी आहे. मात्र, काल पाकिस्तान जिंकल्यावर भारताच्या काही भागात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. जर हे क्रिकेटच्या विजयांचे सेलिब्रेशन करीत असतील तर, याला माझा विरोध नाही. पण, दिवाळीत फटाके फोडण्यावर देशात बंदी का? पर्यावरण रक्षणाचा खोटेपणा तेव्हाच का जागा होतो? दिवाळीत सर्व ज्ञान वाटू लागतात" असे प्रश्न त्याने ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.
टी-20 विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने विजय मिळवून भारताचा विक्रम मोडीत काढला. विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तानच्या संघाला एकही सामना जिंकता आला नव्हता. टी-20 विश्वचषक असो किंवा वन-डे वर्ल्डकप भारताने आतापर्यंत प्रत्येकवेळी पाकिस्तानला पराभवाचे पाणी पाजले. मात्र, बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या संघाला विश्वचषकात भारताविरुद्ध पहिल्यांदाच विजय मिळवता आला आहे.
भारत ज्या गटात आहे, त्याला ग्रुप ऑफ डेथ असे म्हटले जाते. पाकिस्तान विरोधात पराभव स्वीकारल्यानंतर भारताचा पुढील सामना न्यूझीलंडच्या आणि अफगाीस्तानसोबत होणार आहे. अशावेळी स्पर्धेची सुरुवात ही नेहमी विजयानेच झालेली चांगली असते. दुर्देवाने भारताची सुरुवात पराभवाने झाली. यामुळे यापुढचे गणित हे जर-तर च्या शक्यतांवर अवलंबून राहणारे आहे. भारताला पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे.
संबंधित बातम्या-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)