Rohit Sharma Viral Video : ‘डोकं ठिकाणावर आहे का...’ रोहित शर्मा छोट्या भावावर का रागावला? व्हिडीओ व्हायरल

ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये शुक्रवारी शरद पवार, अजित वाडेकर व रोहित शर्मा यांच्या नावांच्या स्टँडसह अमोल काळे स्मृती एमसीए ऑफिशियल लाऊंजचे उद्घाटन करण्यात आले.

Continues below advertisement

Rohit Sharma Scold Younger Brother Viral Video : ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये शुक्रवारी आयसीसी, बीसीसीआय आणि एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार, भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर व स्टार फलंदाज रोहित शर्मा यांच्या नावांच्या स्टँडसह अमोल काळे स्मृती एमसीए ऑफिशियल लाऊंजचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे कसोटी निवृत्तीनंतरही रोहित शर्मा सतत चर्चेत असतो. या सत्कार समारंभात, रोहितचे पालक आणि पत्नी रितिका सजदेह देखील व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचा धाकटा भाऊ विशाल देखील या कार्यक्रमात उपस्थित होता. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की रोहित त्याच्या धाकट्या भावावर रागावला.

Continues below advertisement

हे प्रकरण गाडीतील डेंटशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. गाडीच्या डेंटकडे बोट दाखवत रोहितने त्याचा धाकटा भाऊ विशालला विचारले, "हे काय आहे?" "तुला दिसत नाहीये का? तुझ डोकं ठिकाणावर होत का नाही? या घटनेनंतर रोहित शर्माने आपल्या कुटुंबाला गाडीत बसवले आणि तेथून निघून गेला. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की, रोहित शर्माला गाड्यांचाही खूप शौक आहे. वानखेडे स्टेडियममधून समोर आलेला हा व्हायरल व्हिडिओ देखील त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे.

रोहित शर्माची पत्नी रितिका लागली रडू अन्...

वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा स्टँडचे उद्घाटन झाले, तेव्हा त्यांची पत्नी रितिका सजदेह देखील स्टेजवर उपस्थित होती. रितिकाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला, ज्यामध्ये तिच्या डोळ्यात पाणी आले. ती सर्वांच्या मागे जाऊन अश्रू पुसतानाही दिसली.

दुसरीकडे, उद्घाटन समारंभात रोहित शर्मा म्हणाला की, त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात वानखेडे येथून झाली आणि त्याच मैदानावर वेगळा स्टँड मिळणे ही खूप सन्मानाची गोष्ट आहे. रोहित शर्माने आता कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता तो फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करेल.

रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड नाराज!

दुसरीकडे या सोहळ्यादरम्यान रोहित शर्माच्या बालपणाचे प्रशिक्षक दिनेश लाड हे उपस्थित नव्हते. त्यावरून ते म्हणाला की, "मला व्हॉट्सअॅपवर निमंत्रण मिळाली होती. परंतु, असे निमंत्रण अपेक्षित नव्हते, कारण मी रोहित, शार्दुल ठाकूर यांसारखे अनेक क्रिकेटपटू मुंबईसाठी घडविले. मग अशा प्रकारचे निमंत्रण मिळाल्याने निराशा झाली.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola