T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसलाय. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळं टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलाय. त्यानंतर बुमराहच्याजागी कोणत्या गोलंदाजाला भारतीय संघात स्थान दिलं जाणार आहे? अशा अनेक चर्चांना उधाण आलं आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमी ( Mohammed Shami) आणि दीपक चाहर (Deepak Chahar) यांची नावं सध्या आघाडीवर आहेत. दरम्यान, बीसीसीआय (BCCI) आज बुमराहच्या पर्यायी खेळाडूची घोषणा करू शकते.
शामी- चाहरच्या फिटनेस चाचणीनंतर बीसीसीआय घेणार निर्णय
मोहम्मद शामी आणि दीपक चाहर या दोघांच्या दुखापतींमुळं भारतीय संघाच्या अडचणीत भर पडलीय. दुखापतीनंतर मोहम्मद शमीनं पुनरागमन केलं. मात्र. त्यानंतर कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं त्याला पुन्हा संघाबाहेर पडावं लागलं. मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांची आज बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस चाचणी होणार आहे. दोन्ही खेळाडूंच्या फिटनेस चाचणीनंतर विश्वचषकात जसप्रीत बुमराहच्या जागी कोणाची निवड केली जाईल? याचा निर्णय घेतला जाईल.
मोहम्मद शामी, दीपक चाहर 12 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार
आगामी टी-20 विश्वचषकात मोहम्मद शामी आणि दीपक चाहरची भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. दोघंही 12 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होतील, असं मानलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी दीपक चहरला पाठीला दुखापत झाल्याची बीसीसीआयनं माहिती दिली. यामुळं त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आलंय.
टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
राखीव खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
हे देखील वाचा-