IND vs SA, 2n ODI, Weather Report : आज रांची येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना असून पहिला सामना भारताने गमावल्याने मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजचा विजय महत्त्वाचा आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने आज विजय मिळवल्यास ते मालिकाही जिंकतील. त्यात देशभरातील बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावल्याने आजच्या सामन्यातही पावासाने व्यत्यय आणल्यास सामना हवा तसा होणार नाही. पहिल्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 2 ते 3 तास उशिराने सुरु झाला तसंच दोन्ही संघाना प्रत्येकी 40 ओव्हर खेळाव्या लागल्या. त्यात आजच्या सामन्यातही पाऊस येईल का? हा प्रश्न अनेकांसमोर असून यासाठी नेमकी हवामानाची स्थिती कशी आहे, पाहूया...


Accuweather ने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या सामन्यादरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यचा वर्तविली जात आहे. सामना होणाऱ्या रांचीच्या मैदानात 47 टक्के पाऊस येण्याची शक्यता आहे. सामना होणाऱ्या ठिकाणी 70 टक्के ढगाळ वातावरण असू शकतं. त्यामुळे आज पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता असल्याने नेमका सामना कसा आणि किती वेळात होईल हे सांगणं अवघड आहे. याशिवाय  तापमानाचा विचार करता तापमान हे 23 ते 29 अंशांच्या आसपास राहू शकतो.  


कधी, कुठे पाहू शकता सामना?


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना (India vs South africa 2nd ODI) भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाणार आहे. सामना रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


कशी असू शकते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया?


शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर.


हे देखील वाचा-