South Africa Tour Of India: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयनं (BCCI) दीपक चहरच्या (Deepak Chahar) जागी वॉशिंग्टन सुंदरची (Washington Sundar) निवड केलीय. इंदूरमध्ये खेळण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात दीपक चाहरला दुखापत झाली. ज्यामुळं त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतून बाहेर पडावं लागलंय. मात्र, वॉशिंग्टन सुंदर स्वत:च गेल्या काही महिन्यांपासून दुखापतींशी झुंज देतोय. दुखापतींमुळं वॉशिंग्टनला अनेक सामन्यांना मुकावं लागलंय. यावरून भारतीय क्रिकेट चाहत्यांनी बीसीसीआयला ट्रोल केलं आहे. 


"लखनऊमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली. दीपक चाहर आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे (एनसीए) जाणार आहे आणि तेथील वैद्यकीय पथक त्याच्यावर देखरेख ठेवेल", अशी माहिती बीसीसीआयनं शनिवारी दिली.


ट्वीट-






 


ट्वीट-






 


ट्वीट-






 


ट्वीट-






 


ट्वीट-






 


भारत-द.आफ्रिका यांच्यात आज रंगणार दुसरा एकदिवसीय सामना
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 9 ऑक्टोबर 2022 रोजी रांची येथे खेळला जाणार आहे. तर, 11 ऑक्टोबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे मालिकेतील अंतिम एकदिवसीय सामना खेळेल.


भारताचा एकदिवसीय संघ: 
शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद. सिराज, वॉशिंग्टन सुंदर.


हे देखील वाचा-