IND vs SA, ODI Series : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरु तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. भारताला पहिल्या सामन्यात 9 धावांनी पराभव स्विकारावा लागला. ज्यामुळे मालिकेतील पहिला सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेने 1-0 ची आघाडी घेतली आहे. आजचा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला तर ते मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतील. पण भारताने सामना जिंकला तर भारत मालिकेत 1-1 ची बरोबरी साधू शकेल. ज्यामुळे आजचा सामना जिंकणं भारतासाठी अनिवार्य आहे. तर अशा या दोन्ही संघासाछी महत्त्वाचा असणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ...


कधी आहे सामना?


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना आज अर्थात 9 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होणार आहे.


कुठे आहे सामना?


हा सामना रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे.  


कुठे पाहता येणार सामना?


या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


दीपक आऊट सुंदर इन


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय मालिकेसाठी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनं दीपक चहरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरची निवड केलीय. इंदूरमध्ये खेळण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात दीपक चाहरच्या पाठीला दुखापत झाली. ज्यामुळं लखनऊ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही दीपक चाहर भारताच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग नव्हता.


कसा आहे भारतीय संघ?


शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर.





हे देखील वाचा-