IND vs SA, ODI Series : भारतीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात आता उद्यापासून अर्थात 6 ऑक्टोबरपासून एकदिवसीय मालिका रंगणार आहे. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर तिसरा सामना भारताने गमावला. ज्यामुळे मालिका भारताने 2-1 ने गमावली. आता एकदिवसीय मालिका आता सुरु होणार आहे. यावेळी कर्णधार म्हणून शिखर धवन असणार आहे, तर श्रेयस अय्यरला उपकर्णधार असणार आहे. याशिवाय युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आयपीएल गाजवल्यानंतर संघात स्थान मिळालेल्या रजत, शाहबाजसारख्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर पहिल्या एकदिवसीय सामन्याबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेऊ...

कधी आहे सामना?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना उद्या अर्थात 5 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होणार आहे.

कुठे आहे सामना?

हा सामना लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

कसा आहे भारतीय संघ?

शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 6 ऑक्टोबर 2022 लखनौ
दुसरा एकदिवसीय सामना 9 ऑक्टोबर 2022 रांची 
तिसरा एकदिवसीय सामना 11 ऑक्टोबर 2022 दिल्ली

हे देखील वाचा-