India Vs West Indies: भारताविरुद्ध तीन सामन्याच्या टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडीजनं 16 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. या मालिकेत पोलार्ड वेस्ट इंडीजच्या संघाची कमान संभळणार आहे. तर, निकोलस पूरन उप- कर्णधार असणार आहे. महत्वाचं म्हणजे, शमराह ब्रुक्स आणि केमार रोच यांना टी-20 मालिकेतून वगळण्यात आलंय. हे दोघ केवळ एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारत दौरा करणार आहेत. 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे, त्यानंतर दोन्ही संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आमनेसामने येतील. सर्व एकदिवसीय सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जातील. त्यानंतर कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर टी-20 मालिका खेळली जाणार आहे. 

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक6 फ्रेबुवारी 2022- अहमदाबाद9 फेब्रुवारी 2022- अहमदाबाद12 फेब्रुवारी 2022- अहमदाबाद

टी-20 मालिकेचं वेळापत्रक15 फ्रेब्रुवारी 2022- कोलकाता18 फेब्रुवारी 2022- कोलकाता20 फेब्रुवारी 2022- कोलकाता

वेस्ट इंडीज टी-20 संघ-पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, डॅरेन ब्राव्हो, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, डॅमनिक डेरेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, ब्रँडन किंग, रोव्हमन पॉवेल, ओडियन स्मिथ, रोमॅरियो शेफर्ड, काइल मेयर्स हेडन वॉल्स.

1) निकोलस पूरन: वेस्ट इंडिजचा हा यष्टिरक्षक फलंदाज इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. निकोलस पूरननं 5 सामन्यात 41 च्या सरासरीने 164 धावा केल्या.

2) रोव्हमन पॉवेल: वेस्ट इंडीजच्या या मधल्या फळीतील फलंदाजानं इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत 193 धावांच्या जोरदार स्ट्राइक रेटने जोरदार फलंदाजी केली. त्यानं 73.50 च्या सरासरीनं 147 धावा केल्या. वेस्ट इंडिज-इंग्लंड मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकावर होता.

3) जेसन होल्डर: वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूने इंग्लंडविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यात 144 धावांत 15 बळी घेतले. त्याची गोलंदाजीची सरासरी 9.60 होती. संपूर्ण मालिकेत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.

4) अकिल हुसेन: वेस्ट इंडिजच्या या फिरकीपटूने इंग्लंडविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यांमध्ये 120 धावांत 8 बळी घेतले. त्याची गोलंदाजीची सरासरी १५ होती. संपूर्ण मालिकेत तो दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

5) पोलार्ड: वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्डने इंग्लंडविरुद्ध संपलेल्या मालिकेत शानदार अष्टपैलू कामगिरी केली. त्याने 5 सामन्यांच्या 4 डावात 3 वेळा नाबाद राहताना 69 धावा केल्या. यासोबतच त्याने 4 विकेट्सही घेतल्या.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha