World Cup 2023, IND vs AFG  : विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने विजयी सुरुवात केली. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. मिशन वर्ल्डकपसाठी भारतीय संघ आज दिल्लीमध्ये दाखल झाला आहे. बुधवारी, 11 ऑक्टोबर रोजी भारताचा सामना अफगाणिस्तानविरोधात पार पडणार आहे. त्यासाठी भारतीय संघ आज दिल्लीमध्ये दाखल झाला आहे. 


बुधवारी 11 ऑक्टोबर रोजी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये दिल्ली येथी सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ दिल्लीमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघासोबत शुभमन गिल आला नाही. शुभमन गिल चेन्नईमध्येच उपचार घेणार आहे. शुभमन गिल याला दोन दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली आहे. 






कधी, कुठे सामना ?


वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि अफगानिस्तान यांच्यातील सामना 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये हे दोन्ही संघ आमने सामने येतील. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे, त्यापूर्वी नाणेफेक होईल. 






ईशानला मिळणार संधी - 


चेन्नई येथे झालेल्या भारताच्या पहिल्या सामन्याला सलामी फलंदाज शुभमन गिल मुकला होता. डेंग्यू झाल्यामुळे शुभमन गिल याला ऑस्ट्रेलियाविरोधात खेळू शकला नाही.  त्याच्या जागी इशान किशन याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्याला संधीचं सोनं करता आलं नव्हतं. गिल शून्यावर बाद झाला होता. आता अफगाणिस्तानविरुद्धही शुभमन खेळणार नसल्यामुळे, त्याच्या जागी इशानलाच सलामीला खेळण्याची संधी मिळणार आहे. 


अफगाणिस्तानविरोधात मुकाबला -


वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि अफगानिस्तान यांच्यातील सामना 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये हे दोन्ही संघ आमने सामने येतील. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे, त्यापूर्वी नाणेफेक होईल. या मैदानावर झालेल्या आधीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला होता. दक्षिण आफ्रिकेने 428 धावा चोपल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल श्रीलंकेनेही येथे 300 पेक्षा जास्ता धावा चोपल्या होत्या. भारत आणि अफगाणिस्तान सामन्यातही धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


भारताची विजयी सुरुवात -