Zainab Abbas Leave India : पाकिस्तानची प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रजेंटर आणि अँकर जैनब अब्बास ही अचानक विश्वचषक सोडून भारतामधून परतली आहे. विश्वचषकासाठी जैनब भारतामध्ये परतली होती. जैनब हिने आतापर्यंत भारताविरोधात अनेकदा वादग्रस्त वक्तव्य आणि ट्वीट केलेली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  जैनब हिच्यावर याआधी सायबर क्राईम, भारत आणि हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह भाषेत ट्वीट केल्याचा आरोप होता. तीचे जुने ट्वीट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये भारत आणि हिंदू धर्माबद्दल आपत्तीजनक पोस्ट केलेलं दिसत होते. जैनब हिच्याबद्दल बीसीसीआयकडे एका वकीलाने तक्रार केली होती. त्यामुळेच जैनब अब्बास हिला भारत सोडावा लागला. 


पाकिस्तानी न्यूज चॅनल ‘समा टीवी’ ने जैनब अब्बल हिच्याबाबत एक्स खात्यावर पोस्ट केली आहे.  जैनब अब्बास हिने भारत सोडला आहे. सुरक्षेच्या कारणामुळे जैनबला भारत सोडावा लागला. सध्या ती दुबाईमध्ये आहे. तिच्यावर सायबर क्राईम आणि भारताविरोधीत ट्वीटचा आरोप आहे. 






‘फ्री प्रेस जर्नल’च्या रिपोर्ट्सनुसार, विनीत जिंदल नावाच्या भारतीय वकिलाने बीसीसीआयकडे जैनबची तक्रार केली होती. विनीत जिंदाल याने ट्वीट करत तक्रारीचे पत्रही पोस्ट केले आहे. विनीत जिंदालचे ट्वीटही सध्या चर्चेचा विषय आहे. विनीत जिंदाल याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, BCCI आणि गृह मंत्रालयाला पाठवलेल्या तक्रारीमध्ये जैनाब अब्बास हिला ICC विश्वचषक 2023 मध्ये प्रजेंटर म्हणून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. जैनबने भारत आणि हिंदू धर्माविरुद्ध अपमानास्पद आणि प्रक्षोभक पोस्ट केल्या आहेत. ‘अतिति देवो भव’ हे फक्त आपल्या देशाचा आणि हिंदू धर्माचा आदर करणाऱ्यांसाठी आहे, पण भारतविरोधी स्वागत नाही. 






जैनबने भारतात विश्वचषकासाठी येण्याआधी ट्वीट केले होते. हे ट्वीटही सध्या चर्चेत आहे.