Viral Video: पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमदनं (Sarfaraz Ahmed) अनेक प्रसंगी संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो संघाबाहेर आहे. नुकताच सर्फराज एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो फलंदाजी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सर्फराज एका पाच वर्षाच्या मुलानं क्लीन बोल्ड केलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. तर, काही नेटकरी त्या लहान मुलाच्या गोलंदाजीचं कौतूक करताना दिसत आहेत. 


सर्फराज आणि एका लहान मुलाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सर्फराज अहमद फलंदाजी करताना दिसत आहे. तर, तो गोलंदाजी करत आहे. या दरम्यान त्यानं टाकलेल्या चेंडूवर सर्फराज अहमद चक्क क्लीन बोल्ड झालाय. एका युजरनं हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केलाय. या व्हिडिओवर लाईव्हचा वर्षाव होताना दिसत आहेत. तर, अनेकजण सर्फराज अहमदला ट्रोलही करत आहेत. मैदानात भल्याभल्या गोलंदाजांचा समाचार घेणारा एका लहान मुलाच्या गोलंदाजी बोल्ड झाल्याचं एका नेटकऱ्यानं म्हटलंय. 


व्हिडिओ- 






 


सर्फराज अहमदची कारकिर्द
सर्फराजनं त्याच्या कारकिर्दीत 49 कसोटी सामने खेळले आहेत. त्यानं तीन शतक आणि 18 अर्धशतकांच्या  3 शतके आणि 18 अर्धशतकांच्या मदतीनं 2 हजार 657 धावा केल्या आहेत. सर्फराजची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या 112 धावा आहे. त्यानं 117 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 हजार 315 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन शतके आणि 11 अर्धशतके झळकावली आहेत. सर्फराजनं 61 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 818 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्यांनं तीन अर्धशतके झळकावली आहेत.


हे देखील वाचा-