England vs India : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. 1 जुलैपासून सुरु होणारे हे सामने आधी एकमेव कसोटी नंतर टी20 आणि अखेर एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान या महत्त्वाच्या सामन्यांसाठी भारतीय संघ (Team India) इंग्लंडमध्ये पोहोचला असून आता प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माही इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर सरावाला सुरुवात झाली आहे. बीसीसीआयने खेळाडू सराव करत असलेला एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. यामध्ये स्ट्रेन्थ आणि कडिशनिंग कोच सोहम देसाई (Soham Desai) सरावाबद्दल माहिती देताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये सर्व खेळाडू वॉर्मअप करताना दिसत आहे. हलका व्यायाम, मैदानाच्या फेऱ्या, कॅच प्रॅक्टिस तसंच इतर खेळ खेळताना खेळाडू दिसत आहेत. यावेळी सोहम यांनी सरावाबद्दल सांगताना, 'सध्या सरावाची सुरुवात असून बऱ्याच महिन्यानंतर खेळाडू कसोटी सामना खेळणार असल्याने आता खेळाडू वॉर्मअप करताना दिसत आहेत.'
पाहा व्हिडीओ -
इंग्लंड आणि भारत यांच्यात 1 ते 5 जुलै रोजी एकमेव कसोटी होणार असून त्यानंतर खालीलप्रमाणे सामने पार पडणार आहेत. त्यानंतरचे सामने खालीलप्रमाणे खेळवले जातील.
इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 7 जुलै | एजेस बाउल |
दुसरा टी-20 सामना | 9 जुलै | एजबॅस्टन |
तिसरा टी-20 सामना | 10 जुलै | ट्रेंट ब्रिज |
इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै | मँचेस्टर |
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
हे देखील वाचा-