Hardik Pandya Team India : भारतीय संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मागील काही काळापासून तुफान फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचं जेतेपद पांड्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरात टायटन्सनं जिकंल, यावेळी पांड्याने दमदार खेळी करत उत्तम नेतृत्त्व देखील केलं. ज्यानंतर हार्दिक पांड्याला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) सामन्यांसाठी थेट टीम इंडियामध्ये (Team India) एन्ट्री मिळाली, तर आयर्लंड दौऱ्यात तर थेट कर्णधारपदही मिळालं. या सर्वानंतर अनेक माजी खेळाडू अजूनही पांड्याचं कौतुक करत असून माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफ यानेही पांड्याच्या नेतृत्त्व गुणांचं कौतुक केलं आहे.
कैफने हार्दिकची टीम प्लेसमेंट म्हणजेच क्षेत्ररक्षण लावण्याची कला जबरदस्त असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मोहम्मद कैफ आयपीएल 2022 चा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पाहण्यासाठी गेला होता. त्याठिकाणचा अनुभव सांगताना कैफ म्हणाला, "मी अहमदाबादमध्ये फायलन पाहताना पांड्याची कप्तानी लाईव्ह पाहिली. त्यावेळी त्याच्या संघातील खेळाडूंनी दबाव असताना केलेली कामगिरी उल्लेखनीय होती. तसंच हार्दिकने अगदी उत्तमरित्या क्षेत्ररक्षण लावलं होतं.''
हार्दिकची आयपीएल 2022 मधील कामगिरी
यंदा हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार म्हणून उत्तम खेळत खेळाडू म्हणूनही चांगली कामगिरी केली. संघाला आयपीएल 2022 चं जेतेपद हार्दिकने मिळवून दिलं. शिवाय गुजरात टायटन्सकडून (GT) खेळताना हार्दिक पांड्याने 15 सामन्यात 487 रन केले आहेत. यावेळी त्याची सरासरी 44.27 असून स्ट्राइक रेट 131.26 इतका आहे. यावेळी त्याने 4 अर्धशतकं ठोकली असून 87 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तो उत्तमप्रकारे गोलंदाजी देखील करताना दिसून आला. याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्धही हार्दिकने उत्तम कामगिरी केली. पांड्याने 4 डावात 153.9 च्या स्ट्राईक रेटने 117 रन केले. तर पाच ओव्हरही त्याने टाकले.
हे देखील वाचा-