IND vs PAK World Cup 2023 Match Tickets : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटले की क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानीच असते. पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना म्हटले की चाहत्यांचा उत्साह शिगेला असतो. त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात फक्त आयसीसी स्पर्धेतच लढत होते. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी चाहते हजारो, लाखो रुपये खर्च करतात. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी आधीपासूनच तयारी सुरु केली होती. तिकिटांची खरेदी करण्याआधीच अनेकांनी हॉटेल्स, फ्लाइट तिकिट काढली होती. हॉटेल रुमच्या रेंटमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले होते. आता भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या तिकिटाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटांची किंमतीने उच्चांक गाठले आहेत.  भारतीय सामन्याची तिकिटे काही संकेतस्थळाने विकली आहेत. एका संकेतस्थळावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटे उपलब्ध आहेत... पण त्याची किंमत लाखो रुपये इतकी आहे. 


यंदाचा विश्वचषक भारतामध्ये होत आहे... 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरोधात चेन्नई येथे होणार आहे. विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर होणार आहे.  या सामन्यासाठीचे तिकिटाची किंमत लाखो रुपयात झाली आहे. वियागोगो नावाच्या संकेतस्थळावर भारत आणि पाकिस्तान सामन्याचे तिकिटांची किंमत तब्बल 57 लाख रुपये इतकी आहे. एका तिकिटाची किंमत तब्बल 57 लाख रुपये असल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. वियागोगो संकेतस्थळावर अपर टीयर सेक्शनच्या एका तिकिटाची किंमत 57 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे दिसतेय. तर सेक्शन एन6 चीही वेगळी स्थिती नाही. या संकेतस्थळावर भारत आणि पाकिस्तान सामन्याचे तिकिट 80 हजार रुपयांपासून सुरु होतेय. वियागोगो संकेतस्थळावरील भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या तिकिटाची किंमत पोस्ट करत चाहत्यांनी सोशल मीडियावर बीसीसीआयला सवाल केला आहे.





 



एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात होणार आहे. भारतामध्ये विश्वचषकाची तयारी सुरु झाली आहे. पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना आठ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14  ऑक्टोबर रोजी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा थरार पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.  प्रत्येकजण यासाठी तयारी करत आहेत. प्रत्येकाला हा सामना स्टेडिअममध्ये पाहायचा आहे. 


आणखी वाचा :


World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ, हॉटेल्स मिळेना म्हणून चाहत्याकडून हॉस्पिटलचे बेड बूक


India-Pak : मौका मौका, भारत-पाक हायव्होल्टेज मॅच, आतापासूनच हॉटेल फुल्ल, 5 हजाराचा दर 50 हजारावर!


World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ, फ्लाईट्स तिकिटात 300 टक्क्यांनी वाढ, मुंबई-अहमदाबादचे तिकिट 22 हजार रुपये