Virender Sehwag son Aaryavir : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग खेळला तेव्हा त्याची गणना जगातील सर्वात आक्रमक फलंदाजांमध्ये केली जात होती. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याची त्याची शैली तुफानी होती. त्यामुळेच कसोटीत त्याच्या नावावर 2-2 तुफानी त्रिशतके आहेत. सेहवागच्या निवृत्तीनंतर त्याचा मुलगाही आता क्रिकेटमध्ये हात आजमावत आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, वडील वीरेंद्र सेहवागप्रमाणेच मुलगा आर्यवीरनेही क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे.
आर्यवीर सेहवागने कूचबिहार ट्रॉफीमध्ये दिल्लीसाठी द्विशतक झळकावून खळबळ उडवून दिली आहे. 17 वर्षीय आर्यवीरने शिलाँगच्या एमसीए क्रिकेट मैदानावर 200 धावांची नाबाद इनिंग खेळली. यादरम्यान त्याने 34 चौकार आणि 2 षटकार मारले. अशा प्रकारे तो सर्वांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरला. आर्यवीरच्या या शानदार खेळीमुळे दिल्ली संघाला 208 धावांची आघाडी मिळवता आली.
आर्यवीरने खेळली स्फोटक खेळी
दिल्लीकडून सेहवागचा मुलगा आर्यवीरने 229 चेंडूत नाबाद 200 धावा केल्या. अर्णव बुग्गासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या आर्यवीरने आपल्या खास खेळीत एकूण 36 चौकार लगावले. बुग्गाने 108 चेंडूत 114 धावांची खेळी खेळली. मेघालयच्या 260 धावांना प्रत्युत्तर देताना दिल्लीने दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत 81 षटकांत 2 गडी गमावून 468 धावा केल्या होत्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत आर्यवीर धन्या नक्रासह फलंदाजी करत होता. धन्या 98 धावा करून खेळत आहे. कूचबिहार ट्रॉफी ही 19 वर्षाखालील वयोगटातील भारताची प्रमुख बहु-दिवसीय देशांतर्गत स्पर्धा आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला आर्यवीरने विनू मांकड ट्रॉफीमध्ये मणिपूरविरुद्ध दिल्लीकडून अंडर-19 मध्ये पदार्पण केले. त्याने 49 धावांची शानदार खेळी खेळली. आर्यवीर ज्युनियर क्रिकेटमध्ये सतत धावा करत आहे. गेल्या वर्षी सेहवागने खुलासा केला होता की त्याचा मुलगा आर्यवीर याने आधीच आयपीएल करारावर लक्ष केंद्रित केले आहे.
हे ही वाचा -