Australia vs India 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे, जिथे कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, प्लेइंग इलेव्हनमध्ये शुभमन गिलचे नाव न आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण बीसीसीआयनेच आता गिल प्लेइंग-इलेव्हनचा भाग का नाही याची माहिती पोस्ट केली आहे.
पर्थ कसोटी का खेळत नाही शुभमन गिल?
पर्थ कसोटी सुरू होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. कारण टीम इंडियासाठी नंबर-तीनवर महत्त्वाची खेळी खेळण्याची क्षमता त्याच्यात आहे. मात्र, खुद्द बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट करून दुखापतीमुळे प्ले-11 मधून बाहेर असल्याची माहिती दिली आहे.
BCCI ने ट्विटमध्ये लिहिले की, WACA येथे मॅच सिम्युलेशनच्या दुसऱ्या दिवशी शुभमन गिलच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीसाठी त्याची संघात निवड झाली नव्हती. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक दररोज त्याच्या लक्ष ठेवून आहे.
2 युवा खेळाडूंना मिळाली पदार्पणाची संधी
पर्थ कसोटी सामन्यात भारताच्या दोन युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली आहे. नितीश रेड्डी आणि हर्षित राणा यांना विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांनी कसोटी कॅप दिली आहे. त्याचबरोबर शुभमन गिलच्या जागी देवदत्त पडिक्कलला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळाली आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.