Australia vs India 1st Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून म्हणजेच शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधाराने प्लेईंग इलेव्हनबाबत खूप महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यावेळी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनाही प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले आहे. संघातील एकमेव फिरकी वॉशिंग्टन सुंदर आहे. यासोबत हर्षित राणा आणि नितीश रेड्डी पदार्पण करतील. टीम इंडियाने गेल्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यांमध्ये कांगारूंना पराभूत केले आहे, त्यामुळे भारताच्या नजरा विजयाच्या हॅट्ट्रिककडे असतील.
नितीश कुमार रेड्डीची कारकीर्द कशी राहिली?
नितीश कुमार रेड्डी यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली तर त्याने 23 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 779 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी 159 धावांची आहे. त्याचबरोबर नितीश रेड्डीने 23 सामन्यांच्या 42 डावात 56 विकेट घेतल्या आहेत. त्याने टी-20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. कसोटीतही त्याच्याकडून अशीच कामगिरी अपेक्षित आहे.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.
भारताची प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.