T20 World Cup 2024 : रनमशीन विराट कोहली टी20 विश्वचषकासाठी आज रवाना झालाय. मुंबई विमानतळावर विराट कोहली स्पॉट झालाय. आयपीएल 2024 नंतर विराट कोहलीने बीसीसीआयकडून काही दिवसांचा ब्रेक मागितला होता, जो स्वीकारण्यात आला होता. यामुळेच कोहली टीम इंडियासोबत अमेरिकेला गेला नव्हता. पण काही दिवसांच्या ब्रेकनंतर विराट कोहली आता अमेरिकेसाठी रवाना झालाय. भारतीय संघ दोन बॅचमध्ये अमेरिकाला गेलाय. रोहित शर्मासह काही खेळाडू 25 मे रोजी अमेरिकेला गेले होते. तर त्यानंतर 27 तारखेला उर्वरित खेळाडू रवाना झाले होते.
25 मे रोजी विराट कोहलीही अमेरिकेला जाणार होता. पण त्यानं आराम करण्यासाठी बीसीसीआयकडून पाच दिवसांची अतिरिक्त सुट्टी मागितली होती. आयपीएल 2024 मध्ये विराटच्या आरसीबीचा राजस्थानविरोधात पराभव झाला होता. विराट कोहलीला 3 दिवसांचा आराम मिळाला होता. पण विराट कोहलीने आणखी काही दिवस आरामाची विनंती बीसीसीआयकडे केली होती. कुटुंब आणि मित्रांसोबत पुरेसा वेळ घालवल्यानंतर विराट कोहली आज यूएसएला रवाना झाला आहे. यावेळी मुंबई विमानतळावर एका चाहत्याच्या स्केचही ऑटोग्राफ केले.
बांगलादेशविरोधात वॉर्मअप सामना खेळणार का ?
दोन जूनपासून टी20 विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरुवात होत आहे. विश्वचषकासाठी टीम इंडिया अमेरिकेत दाखल झाली असून कसून सरावाला सुरुवात केली आहे. भारताचा पहिला सामना पाच जून रोजी आयर्लंडविरोधात होणार आहे. त्याआधी एक जून रोजी भारतीय संघ बांगलादेशविरोधात वॉर्मअप सामना खेळणार आहे. विराट कोहली अद्याप अमेरिकेत दाखल झालेला नाही, त्यामुळे वॉर्मअप सामन्यात खेळणार का? याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
भारत ते न्यूयॉर्कपर्यंत नॉन-स्टॉप फ्लाइटला पोहचण्यासाठी 15 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. जर एक स्टॉप असलेल्या फ्लाईटने न्यूयॉर्कला पोहोचण्यासाठी 20-25 तास लागतात. म्हणजेच कोहली भारतीय वेळेनुसार 31 मे रोजी संध्याकाळी अमेरिकेत दाखल होईल. अशा परिस्थितीत त्याला विश्रांतीसाठी फारच कमी वेळ मिळेल. कोहलीला सराव सामन्यातून बाहेर ठेवले जाण्याची शक्यता अधिक आहे.
टी20 वर्ल्ड कपसाठी भारताच्या ताफ्यात कोण कोण?
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल , अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू - शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि अवेश खान