Virat Kohli Jets Off to London After Victory Parade मुंबई : टी20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर टीम इंडियाला (Team India) भारतात पोहोचण्यास उशीर झाला होता. बारबाडोसमधील ब्रिजटाऊनमध्ये बेरिल चक्रीवादळामुळं टीम इंडियाला मायदेशी परतण्यास उशीर झाला. बीसीसीआयनं विशेष विमानानं टीम इंडियाला आणणलं. नवी दिल्लीत काल टीम इंडिया पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत विजयी मिरवणूक नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी काढण्यात आली. मिरवणूक आणि वानखेडे स्टेडियममधील जल्लोषात सहभागी झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) मुंबई विमानतळावर दिसून आला. विराट कोहली लंडनला रवाना होत होता, अशी माहिती आहे.


विराट कोहली लंडनला रवाना?


गुरुवारी रात्री मानव मंगलानी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विराट कोहलीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत विराट कोहली मुंबईच्या विमानतळावर दिसून आला. विराट कोहलीनं पांढर्‍या टीशर्ट आणि क्रीम रंगाच्या पँट आणि हिरव्या जॅकेटमध्ये काळ्या गाड्यातून विमानतळावर दाखल झाला होता. तिथून विराट कोहली विमानतळात घाईत जात असताना त्यानं उपस्थित कर्मचाऱ्यांना अभिवादन केलं. रिपोर्टनुसार विराट कोहली लंडनला निघाला होता. तिथं तो अनुष्का शर्मा,मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांना भेटण्याची शक्यता आहे. 







अनुष्का शर्मा अमेरिकेतील बारबाडोस मध्ये विराट कोहलीला प्रोत्साहन देण्यास उपस्थित नव्हती. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी फेब्रुवारीत अकाय नावाच्या मुलाला जन्म दिला होता. भारतानं टी 20 वर्ल्ड कप 29 जूनला जिंकल्यानंतर संपूर्ण संघ चक्रीवादळामुळं अडकून पडला होता. भारतानं विजेतेपद मिळवल्यानंतर विराट कोहली मैदानावरुन व्हिडिओ कॉलवरुन कुटुंबीयांसोबत संवाद सधाताना पाहायला मिळाला होता.  


विराट कोहलीनं टी20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीच्या लढतीपर्यंत विराट कोहलीला दमदार फलंदाजी करता आली नव्हती. मात्र, विराट कोहलीनं अंतिम फेरीत  59 बॉलवर 128.81 च्या स्ट्राईक रेटनं 76 धावा केल्या होत्या. तिथं सहा चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.  


संबंधित बातम्या :



Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...