India vs Australia Semi-Final Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 264 धावा केल्या. आता, रोहितच्या सेनेच्या स्टार फलंदाजांना अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी 265 धावांचे लक्ष्य गाठावे लागेल. यादरम्यान गोलंदाजी करताना कुलदीप यादवने अशी चूक केली की रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही संतापले.
कुलदीपनं बॉल सोडताच विराट लालेलाल
सामन्यात भारतीय संघाकडून कुलदीप यादवने 32 वे षटक टाकले. या षटकातील पाचवा चेंडू स्टीव्ह स्मिथने डीप मिड-विकेटकडे फ्लिक केला. यानंतर तो वेगाने धावला आणि एक धाव पूर्ण केली. पण विराट कोहलीने खूप हुशारीने चेंडू पकडला. यानंतर त्याने तो जोरात कुलदीपकडे फेकला. पण त्याने चेंडू पकडला नाही आणि इथेच त्याने मोठी चूक केली. जर त्याने चेंडू योग्यरित्या पकडला असता तर स्मिथ धावबाद होण्याची शक्यता होती.
यानंतर विराट कोहली कुलदीप यादववर रागाने ओरडताना दिसला. तेव्हा कुलदीप चेंडू पकडू शकला नाही. त्यानंतर चेंडू रोहित शर्माकडे गेला, तोही कुलदीपवर संतापला. अशा परिस्थितीत, एका चुकीमुळे भारतीय गोलंदाजाला रोहित आणि विराटच्या रागाला सामोरे जावे लागले. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने केल्या 264 धावा
ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा कूपर कॉनोली खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडने वेगवान गतीने धावा काढायला सुरुवात केली, पण वरुण चक्रवर्तीने त्याला 39 धावांवर बाद केले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि अॅलेक्स कॅरी यांनी चांगली फलंदाजी केली आणि या दोघांनीही अर्धशतके झळकावली. स्मिथ 73 धावा करून बाद झाला. अॅलेक्स कॅरीनेही 61 धावांची खेळी केली. या खेळाडूंमुळे ऑस्ट्रेलियन संघ फक्त 264 धावा करू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
हे ही वाचा -