Ravindra Jadeja's Pushpa Look Goes Viral: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आपल्या लूक आणि स्टाइलमुळं नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. घोडेस्वारी आणि तलवारबाजीची त्यांची आवड संपूर्ण जगाला माहीत आहे. परंतु, त्याला अभिनयाचीही आवड आहे, हे त्याच्या एका पोस्टमुळं समजत आहे. दरम्यान, जाडेजानं नुकताच प्रदर्शित झालेल्या पुष्पा: द राइज चित्रपटाच्या मुख्य अभिनेता अल्लू अर्जूनच्या लूकमधील त्याचा फोटो पोस्ट केलाय. जाडेजाच्या या लूकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. आता या पोस्टवर स्वत: अल्लू अर्जूनही कमेंट केलीय. 


नुकताच रवींद्र जाडेजानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या पोस्टमध्ये जाडेजानं पुष्पा चित्रपटाचा एक डायलॉग लिहिला आहे. जरी तो या पोस्टमध्ये विडी ओढताना दिसत असला तरी त्यानं इतरांना असं न करण्याचा सल्ला दिलाय. सिगारेट, विडी आणि तंबाखू आरोग्यासाठी हानिकारक आहेत. त्यांच्यामुळं कर्करोग होतो. तुम्ही त्यांच्यापासून दूर राहा, असं जाडेजानं म्हटलंय. जाडेजाच्या या पोस्टवर अल्लू अर्जुननेही कमेंट केलीय. अल्लू अर्जून या पोस्टवर फायर इमोजी पोस्ट करीत Thaggede Le. असा रिप्लाय दिलाय.


ट्विट-



जाडेजाला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीत दुखापत झाली होती. दुखापतग्रस्त झाल्यानं त्याला मुंबईत दुसरा कसोटी सामना खेळता आला नव्हता.  या दुखापतीमुळे जडेजा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही जाऊ शकला नाही. मागील दोन महिन्यांपासून तो संघाबाहेर आहे. तसेच संघात पुनारागमन करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु आहेत. आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी चेन्नईच्या संघानं जाडेजाला 16 कोटी रुपयात रिटेन केलंय. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha