Virat Kohli Batting : क्लासिक कोहली! मिचेल स्टार्कला खेळलेले शानदार शॉट्स बीसीसीआयनं केले पोस्ट, पाहा VIDEO
IND vs AUS 4th Test : विराट कोहलीने अहमदाबाद कसोटीत मिचेल स्टार्कविरुद्ध काही दर्जेदार शॉट्स मारले. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
Virat Kohli, IND vs AUS 4th Test : जागतिक क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 4th Test) यांच्यात सुरु बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 चा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळताना शानदार शतक झळकावलं आहे. दरम्यान सामन्याच्या चौथ्या दिवशी त्यानं शतक पूर्ण केलं असून त्याआधी तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात फलंदाजी करताना त्यानं अर्धशतक पूर्ण केलं. 1204 दिवसानंतर शतक ठोकणारा कोहली आपल्या डावात आतापर्यंत चांगल्या लयीत दिसला. कोहलीने आपल्या डावात मिचेल स्टार्कविरुद्ध काही 'क्वालिटी शॉट्स' मारले, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे.
'क्वालिटी शॉट्सने' चाहत्यांना केलं खुश
बीसीसीआयने किंग कोहलीच्या (Virat Kohli) या शानदार शॉट्सचा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “विराट कोहली विरुद्ध मिचेल स्टार्क.' भारतीय संघाच्या पहिल्या डावाच्या 73 व्या षटकात मिचेल स्टार्कविरुद्ध (Mitchell Starc) कोहलीने दोन शानदार चौकार मारले. त्याने ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर ड्राईव्ह टाकून पहिले चौकार खेळले. क्षेत्ररक्षकाला चुकवत चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचला. त्यानंतर त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने स्टार्कला क्षेत्ररक्षण दिले आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने हलके खेळत चौकार मारला. चाहत्यांना कोहलीचे असेच शॉट्स खूप आवडतात.
पाहा VIDEO-
🏏 @imVkohli 🆚 Mitchell Starc
— BCCI (@BCCI) March 11, 2023
Quality shots on display 👌👌#TeamIndia 🇮🇳 | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/4J9vHV9GGm
दिर्घकाळानंतर कोहलीचं शतक
याआधी अखेरचं कसोटी शतक कोहलीनं बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर 2019 मध्ये ठोकलं होतं. त्यानंतर थेट आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च 2023 मध्ये शतक ठोकलं आहे. आजच्या डावात विराटनं केवळ 5 चौकार ठोकत हे शतक केलं आहे. एकही षटकार त्यानं आज ठोकलेला नाही. दरम्यान 2019 साली कसोटी फॉरमॅटमध्ये शेवटचे शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीची फलंदाजीची सरासरीही गेल्या 20 कसोटी डावांमध्ये खूपच खराब होती. ज्यामध्ये त्याने केवळ 25 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटने फक्त एकदाच 50 हून अधिक धावांची खेळी पाहिली होती, जी डिसेंबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान आली होती. पण आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक ठोकल्यावर विराट पुन्हा फॉर्मात परतेल अशी आशा फॅन्सना आहे.
हे देखील वाचा-